माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी भवितव्य घडवावे- एमकेसीएल मराठवाडा समन्वयक प्रा.महेश पत्रिके

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रगत तंत्रज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी भवितव्य घडवावे- एमकेसीएल मराठवाडा समन्वयक प्रा.महेश पत्रिके
औसा / प्रतिनिधी-सध्याचे युग हे माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग असून डिजिटल तंत्रज्ञानाच्याद्वारे अद्यावत सर्व प्रकारची माहिती इंटरनेट आणि गुगलच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात अद्यावत माहिती आणि ज्ञान आत्मसात करून विद्यार्थ्यांनी आपले उज्वल भवितव्य घडवावे असे प्रतिपादन एमकेसीएलचे मराठवाडा विभागीय समन्वयक महेश पत्रिके यांनी केले. श्री कुमार स्वामी महाविद्यालय औसा येथे एमकेसीएलच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त करियर गायडन्स मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्या कुसुम ढोणे या होत्या. पुढे बोलताना महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे मराठवाडा समन्वयक महेश पत्रिके म्हणाले की, शासनाच्या वतीने विद्यार्थ्यांना अनेक सोयी आणि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. एमकेसीएलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध झाले असून शैक्षणिक ज्ञानासोबत माहिती तंत्रज्ञानाची कास धरून संगणकाचे विविध क्षेत्रातील ज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. सारथी आणि बार्टी या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध झाले आहेत. याचा उपयोग आपले उज्वल भवितव्य घडविण्यासाठी करावा. तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांनाही मोफत संगणकाचे शिक्षण देण्याचा महत्त्वकांक्षी निर्णय सरकारने घेतला आहे. कृषी, अभियांत्रिकी, उद्योग-व्यवसाय, वाणिज्य अशा विविध क्षेत्रांमध्ये उत्तम संधी उपलब्ध झाल्या असून या संधीचा लाभ घेणे गरजेचे आहे. असे सांगून महेश पत्रिके पुढे म्हणाले की, संगणकाच्या विविध अभ्यासक्रमामध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून कौशल्य विकास आधारित अभ्यास करीत प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये कौशल्य निर्माण करावे असेही त्यांनी शेवटी स्पष्ट केले.
यावेळी एमकेसीएल मराठवाडा समन्वयक महेश पत्रीके श्री कुमार स्वामी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कुसूम ढोणे, मनोगतचे संपादक राम कांबळे, प्रा. सुधीर गरड, औसा येथील कॉम्प्युटर पार्कचे संचालक प्रा. काशिनाथ सगरे व सौ. वर्षा सगरे, फ्रेंड्स कॉम्प्युटर संचालक धम्मदीप जाधव, अमेय कॉम्पूटरच्या संचालिका सौ. अमरजा महाजन व उत्तम महाजन, माहेश्वरी कॉम्प्युटरचे संचालक चे सुमित शिंदे, साई कॉम्प्युटर चे संचालक सुनील केवळराम व सौ. केवळराम, उपासे कॉम्प्युटरचे संचालक अमर उपासे, अमर भुत्ते एम. आय. लातूर, निखत कॉम्प्युटर जवळगा संचालक चांद सर, ऋतिक आपसिंगेकर, कृष्णा सूर्यवंशी, महेश जोगदंड, साजिद शेख आदी उपस्थित होते. करीअर गायडन्स मेळाव्यास श्री कुमारस्वामी महाविद्यालयाच्या शेकडो विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते करीअरमंत्र या पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم