लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि; लातूर बँकेस राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान

लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि; लातूर बँकेस राष्ट्रीय पुरस्कार २०२४ प्रदान

बँकेचे संचालक लक्ष्मीकांत सोमाणी बेस्ट स्पीकर म्हणुन सन्मानित

लातूर :- सहकार व बँकिंग क्षेत्रात उत्तमपणे दर्जेदार सेवा देणाऱ्या सहकारी बँकेस देण्यात येणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील मानाचा बेस्ट डिजिटल पेमेंट बँक २०२४* प्रथम पुरस्कार लक्ष्मी अर्बन को-ऑप. बँक लि, लातूर बँकेस दिनांक २३.०८.२०२४ रोजी हॉटेल सहारा स्टार, मुंबई, येथे आयोजित राष्ट्रीय परिषदेत NAFCUB चे चेअरमन लक्ष्मी दास यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी बँकेचे संचालक लक्ष्मीकांत सोमाणी यांना उत्कृष्ठ स्पीकर पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. लक्ष्मीकांत सोमाणी यांनी सहकार चळवळ, नागरी सहकारी बँका समोरील आव्हाने, व नागरी सहकारी बँकाचे योगदान याबाबत राष्ट्रीय परिषदेत स्पीकर म्हणून विस्तृतपणे मत मांडले.
    लक्ष्मी अर्बन बँकेच्या संचालक मंडळाने अतिशय नियोजनबध्द पध्दतीने बँकेचे अधुनिक डिजीटल बँकिंग मध्ये रुपांतर केले आहे. लक्ष्मी अर्बन बँक हि सहकारी बँकामधील लातूर जिल्ह्यातील संपूर्ण डिजीटल सेवा सुरू करणारी पहिली बँक आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या मार्गदर्शन सूचना व सहकार विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून लक्ष्मी अर्बन बँकेने अतिशय प्रेरणादायी वाटचाल केली आहे. आज बँकेकडे, Aadhar Seeding, Mobile Banking App, UPI, IMPS, ATM CARD, QR, BBPS, Franking, Digital 7/12 ई. सुविधा कार्यान्वित आहेत. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, शेतकरी सन्मान योजना अशा विविध शासकीय योजनांची रक्कम आधार लिंक द्वारे आपल्या बँकेच्या खात्यात जमा करून घेण्याची सुविधा आहे.
     बँकेच्या कार्याची दखल घेऊन एसीएमई मिडिया, दिल्ली व NAFCUB या संस्थेने बँकेची BEST DIGITAL PAYMENT BANK 2024 पुरस्कारासाठी निवड केली. मराठवाड्यातील ईतक्या जलद गतीने डिजिटल सेवा सुरू करणारी पहिली बँक म्हणुन बँकेचा नावलौकिक आहे. सदरील पुरस्कार स्विकारण्यासाठी बँकेचे संचालक लक्ष्मीकांत सोमाणी, तज्ञ संचालक किशोर भराडिया, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश आळंदकर, वरिष्ठ अधिकारी सुशिल जोशी हे उपस्थित होते.
     बँकेचे संचालक लक्ष्मीकांत सोमाणी यांना बेस्ट स्पीकर पुरस्काराने सन्मानित केले त्यामुळे बँकेचे चेअरमन. व्हा. चेअरमन, संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीत सभासद, ग्राहकांची मोलाची साथ व बँकेच्या कर्मचारी वर्गाने संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली केलेले काम तसेच बँकेचे स्थानिक सल्लागार, पिग्मी प्रतिनिधी व हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे बँकेस राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त होत असल्याचे बँकेचे चेअरमन अशोक अग्रवाल यांनी व्यक्त केले आहे.
बँकेचे व्हा. चेअरमन सतिश भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे व सभासद, ग्राहकांनी बँकेच्या विविध डिजिटल सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. 

Post a Comment

أحدث أقدم