माहिती तंत्रज्ञानाची जनजागृती मोहीम औसा तालुक्यात होणार

माहिती तंत्रज्ञानाची जनजागृती मोहीम औसा तालुक्यात होणार
औसा/प्रतिनिधी-महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त एमकेसीएल अंतर्गत चालवला जाणारा शासकीय संगणक कोर्स MS-CIT या जनजागृती करिता शहरातील श्री मुक्तेश्वर विद्यालयाचे   संचालक  रवीशंकरप्पा राचट्टे,आगर प्रमुख माने यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी औसा पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष बालाजी शिंदे,दै.सामनाचे पत्रकार विनायक मोरे, दैनिक मनोगतचे कार्यकारी संपादक रामभाऊ कांबळे, गिरीधर जंगाले, महेश्वरी कॉम्प्युटरचे सुमित शिंदे , साई कॉम्प्युटरचे सुनील केवलराम, विनय पिंगळे शहरातील आदी.मान्यवर उपस्थित होते.एमकेसीएल मान्यताप्राप्त विविध संगणक कोर्से जनजागृती करिता  संपूर्ण जिल्हाभर या रथाद्वारे करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांपर्यंत माहिती तंत्रज्ञानाचे विविध कोर्स ची ओळख व्हावी याकरिता याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहेत.तरी आपला सर्वांना संगणक तंत्रज्ञानामध्ये अग्रेसर व्हावे ही विनंती करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم