बाई काकाजी उद्योग समुह, लातूर ला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर च्या वतीने उद्योग क्षेत्रातील "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार प्रदान
लातूर-शहरातील दयानंद सभागृह, लातूर येथे हभप गहिनीनाथ महाराज, औसेकर यांच्या शुभहस्ते व खा.शिवाजीराव काळगे अध्यक्ष, राष्ट्रीय पत्रकार संघ अशोक वानखेडे, संजय भोकरे संस्थापक अध्यक्ष, पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य, वैभव स्वामी मराठवाडा अध्यक्ष, पत्रकार संघ,अशोक देडे जिल्हाध्यक्ष पत्रकार संघ, लातूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बाई काकाजी उद्योग समुह, लातूरच्या सनरीच अक्वाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई जिल्हा शाखा लातूर च्या वतीने उद्योग क्षेत्रातील "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार प्रदान करण्यात आला. बाई काकाजी उद्योगसमूहाचे संचालक प्रमोद मुंदडा, बालकिशन मुंदडा (गुरुजी) यांनी स्वीकारला.उद्योग क्षेत्रातील "महाराष्ट्र भूषण" पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल समाजातील सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
إرسال تعليق