राष्ट्रीय एकात्मता शिबिरात ‘महाराष्ट्राची लोकधारा‘ कार्यक्रमाने मने जिंकली

राष्ट्रीय एकात्मता शिबिरात ‘महाराष्ट्राची लोकधारा‘ कार्यक्रमाने मने जिंकली
लातूर- भारत सरकारच्या युवा व खेळ मंत्रालय, युवा सशक्तीकरण व खेल मंत्रालय, कर्नाटक, राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निदेशालय यांच्या वतीने दिनांक १७ ते २३ सप्टेंबर २०२४ या कालावधीत गांधी भवन, बेंगलूरू येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिर होत आहे. क्षेत्रीय निदेशक अजय शिंदे, राज्याचे शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी, राज्य संपर्क अधिकारी निलेश पाठक, विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे, सहाय्यक संचालक डॉ. दत्तात्रय मठपती यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र +२ स्तरावरील हा संघ या शिबिरात सहभागी झाला आहे. 
     या शिबिरात महाराष्ट्राच्या संघाने महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. भूपाळी, ओवी, वासुदेव, शेतकरी नृत्य गोधळ व लावणी आदी लोककलांचे दर्शन घडवीत महाराष्ट्राच्या संघाने उपस्थित कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, पाँडिचेरी, महाराष्ट्र आदी विविध राज्यातील स्वयंसेवक, संघ व्यवस्थापक व प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंत्रमुग्ध केले. यात दयानंद कला महाविद्यालय लातूर येथील बारावी वर्गातील संकेत तेलंगे, प्रणव माने,रितेश बालाजी मिरगे,कु. रजनंदिणी पाटील, कु. राजनंदिनी धावारे, कु. नकुशा भाडके यांच्यासह राजर्षी शाहू महाविद्यालयायातील रोहन सूर्यवंशी, कु. विद्या सूर्यवंशी, ऋत्विक लव्हूरे यांनी यशस्वी सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी टी कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथील कु. अंशिकासिंग ठाकूर हिने केले.
     विविधतेत एकता हीच आपल्या राष्ट्राची विशेषता आहे. देशातील परंपरा व संस्कृतीची ओळख इतर राज्यातील स्वयंसेवकांना व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्याबरोबरच इतर राज्यातील स्वयंसेवकांनी आपापल्या लोककला व लोकसंस्कृतीचे सादरीकरण केले. या शिबिरात पाँडिचेरी येथील स्वयंसेवकांनी प्रस्तुत केलेले पराई, करागं, सिला, ओईल, सिलंबाम, कोलाटम हे नृत्य प्रकार मनमोहक झाले. कर्नाटकचे यक्षगाण, भरतनाट्यम् व सुग्गी याही कलाप्रकारांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. 
     महाराष्ट्रातील सहभागी विद्यार्थ्यांना डॉ. संदीपान जगदाळे, प्रा. विलास कोमटवाड, प्रा. अनिल भुरे, प्रा. विजय गवळी, प्रा. मनोज शेवाळे यांनी मार्गदर्शन केले. तर दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, ललितभाई शाह, रमेशकुमार राठी, सचिव रमेश बियाणी, कोषाध्यक्ष संजय बोरा, प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, उपप्राचार्य डॉ. दिलीप नागरगोजे, पर्यवेक्षक डॉ. प्रशांत दीक्षित, कार्यालयीन अधीक्षक संजय व्यास यांनी सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم