लातूर कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक औषध निर्माता दिन साजरा

लातूर कॉलेज ऑफ फार्मसीत जागतिक औषध निर्माता दिन साजरा
लातूर -श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित  लातूर कॉलेज ऑफ फार्मसी लातूर येथे दरवर्षीप्रमाणे जागतिक औषध निर्माता दिन २५ सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती  संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, संचलिका माधुरी बावगे, प्राचार्य डॉ.श्रीनिवास बुमरेला  यांनी लाभले.कार्यक्रमाची सुरुवात फार्मासिस्ट प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे प्रकाश सर्जिकलचे संचालक प्रकाश रेड्डी, संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर बावगे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी विशिष्ट प्रकारचे जन प्रभोधनपर घोषवाक्य तयार करून उस्फूर्तपणे रॅलीमध्ये सहभाग नोंदवला. तसेच महाविद्यालयात  सामान्य आजाराची जसे की मधुमेह, उच्च रक्तदाब, दमा आणि बॉडी मास इंडेक्स ऑक्सीजन मोजणी, हिमोग्लोबिन यांची मोफत आरोग्य तपासणी  करण्यात आली. तसेच या आजारावरती विद्यार्थ्यांनी घरोघरी जाऊन रुग्णांना विविध आजारावरती  समुपदेशन केले. त्यानंतर वृक्ष लागवड आणि फॉर्मसिस्ट चा सत्कार करण्यात आला. या दिनी प्रा.अतुल कदम, प्रा.माधुरी पोळकर, प्रा. शबनम शेख, प्रा.सुप्रिया जाधव. प्रा.चैतन्य पवार, प्रा अमोल मुळे आदी शिक्षक,  शिक्षकेतर  कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم