ब्लू बर्ड इंटरनॅशनल स्कूल आलमला मुख्यमंत्री माझी शाळा अभियानांतर्गत खाजगी शाळांमधून प्रथम
औसा (प्रतिनिधी )-मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा -टप्पा क्र. 2 या महाराष्ट्र शासनाच्या शालेय स्पर्धात्मक अभियानांतर्गत औसा तालुक्यातून शासकिय शाळा 179 तर उर्वरित इतर व्यवस्थापनाच्या खाजगी शाळा 76 अपंग शाळा 5 आश्रमशाळा 9 इंग्रजी माध्यमच्या 17 अश्या एकूण 107 शाळामधून ब्लू बर्ड इंटरनॅशनल स्कूल आलमला या शाळेने प्रथम क्रमांक मिळविण्याचा बहुमान मिळविला.
या अभियानांतर्गत पायाभूत सुविधा 33 गुण, शासन ध्येय धोरणे अंमलबजावणी 74 गुण व शैक्षणिक गुणवत्ता 43 गुण असे एकूण 150 गुणांचे मुल्यांकन करण्यात आले. प्रथम शाळा पातळीवर मुख्याध्यापका मार्फत मूल्यांकन करण्यात आले. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातील 14 केंद्राचे केंद्रप्रमुख यांच्याकडून केंद्र स्तरीय मूल्यांकन होऊन प्रत्येक केंद्रांतून प्रथम येणारी एक शाळा तालुका मुल्यांकनासाठी उपलब्ध करण्यात आली. पंचायत समिती औसाच्या वतीने 14 केंद्रांतून प्रथम येणाऱ्या शाळांचे मुल्यांकन करण्यात आले. या मुल्यांकनात ब्लू बर्ड इंटरनॅशनल आलमला स्कूलने औसा तालुक्यातून प्रथम क्रमांक येण्याचा बहुमान पटकावला.
हे अभियान शाळा पातळीवर यशस्वीपणे राबविल्याबद्दल्र शाळेच्या प्राचार्य स्वाती कापसे व सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गाचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य प्रशांत धाराशिवे , विश्वेश्वर धाराशिवे , योगेश धाराशिवे ,प्राचार्य डॉ . कैलास कापसे, सर्व युनिट मधील विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.
إرسال تعليق