शिवलिंग नागापुरे आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या शिक्षक सन्मान पुरस्काराने सन्मानित

शिवलिंग नागापुरे आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या शिक्षक सन्मान पुरस्काराने सन्मानित
औसा (प्रतिनिधी)जिल्हा परिषद कन्या प्रशाला भादा ता औसा येथील विज्ञान शिक्षक श्री शिवलिंग उमाकांत नागापुरे यांना आदर्श मैत्री फाऊंडेशन लातूरच्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे संतोषजी बिराजदार यांनी स्थापन केलेल्या आदर्श मैत्री फाउंडेशन च्या वतीने छत्रपती मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार विक्रमबप्पा काळे साहेब ,आरसीसी क्लासेसचे संचालक प्रा.शिवराज मोटेगावकर सर, द्वारकादास श्यामकुमार ग्रुपचे संचालक तुकाराम पाटील आणि आदर्श मैत्री फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष बिराजदार यांच्या हस्ते शिवलिंग नागापुरे यांना प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शिवलिंग नागापुरे यांना यापूर्वीही महाराष्ट्र शासनाचा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार आणि विविध सामाजिक संस्था यांचे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.त्यांना मिळालेल्या आदर्श मैत्री फाऊंडेशनच्या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

Post a Comment

أحدث أقدم