सिध्देश्वर कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत

सिध्देश्वर कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत
लातूर-सिध्देश्वर कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयामधे प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा "Induction Program" संपन्न झाला. या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून देशीकेंद्र विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री खपाटे सर उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष  शिवलिंग जेवळे सर, योगशिष्ट शिक्षण संस्था सचीव रामदास पवार सचिव संगमेश्वर रासूरे सर, कोषाध्यक्ष ज्योत्सना रासूरे संचालक शामलीला बावगे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन प्रा.उषा भोईबार मॅडमनी केले. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे खपाटे सर यांनी विद्यार्थाना "माझे आहे माझ्यापाशी आणि मीच माझा मार्ग ठरविन" असा संदेश देवून आपल्या यशाचा मार्ग आपणच ठरवावा त्यासाठी ध्येय, मेहनत आणि सातत्य याची जोड असावी असे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच संस्थेचे अध्यक्ष शिवलिंग जेवळे सर, सचिव संगमेश्वर रासूरे सर व रामदास पवार सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पूढील वाटचालीसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.आकाश पाटील सरांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم