लिंगायत समाजाचा 8वा राज्यव्यापी वधुवर परिचय मेळावा उदगीर येथे उत्साहात संपन्न
उदगीर -लिंगायत महासंघ शाखा उदगीरच्या वतीने २७सप्टेंबर रोजी उदगीर येथिल भगिरथ मंगल कार्यालय डँम रोड उदगीर येथे लिंगायत समाजाचा 8वा मोफत राज्यव्यापी वधुवर परिचय मेळावा आयोजित करण्यात आला होता.
या मेळाव्याला प्रचंड गर्दी झाली होती.या ठिकाणी 600वधुवरांनी व हजार दीड हजार पालकांनी हजेरी लावली होती. अतिशय उत्साहात हा वधुवर परिचय मेळावा संपन्न झाला.
यावेळी दिव्य सानिध्य ष.ब्र.108 डॉ वीरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेड,यांचे लाभले होते.तर अध्यक्षस्थानी लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार सर हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लिंगायत समाजाचे ज्येष्ठ माजी आमदार ईश्वरराव भोसीकर,माजी आमदार प्रा मनोहर पटवारी, नगराध्यक्षा स्वाती हुडे,शि भ प शिवराज नांवंदे,उदगीर वीरशैव लिंगायत समाजाचे प्रभारी अध्यक्ष,प्रमोद शेटकार, मल्लिकार्जुन करडखेलकर, लिंगायत महासंघाचे धाराशिव जिल्हाध्यक्ष दत्तात्रय बिराजदार,उमरगा येथील सुभाष जेवळे, यवतमाळचे प्रवीण नेमासे,निलंगा येथिल माजी नगरसेवक अशोक शेटकार, डॉ संतोष बिरादार,ॲड कपाळे नगरसेविका शितल शिंदे ,लिंगायत महासंघाचे प्रदेश सरचिटणीस चंद्रकांत कालापाटील,नुतन मराठवाडा अध्यक्ष प्राचार्य डॉ रामलिंग मुळे, लिंगायत महासंघाचे लातूर जिल्हाध्यक्ष करिबसवेश्वर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पटणे, जिल्हा संघटक काशिनाथ मोरखंडे, नागनाथअप्पा भुरके, जी.जी.ब्रम्हवाले, चंद्रकांत तोळमारे, अमरनाथ मुळे, शिवदास लोहारे,चाकुर तालुकाध्यक्ष सुभाष शंकरे शहराध्यक्ष संजय पाटील, कार्याध्यक्ष धीरज माकणे, महेश पाटील,राम पाटील चाकूरकर संतोष खरोबे, , लिंगायत महासंघाचे अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवकुमार होळदांडगे,देवणी तालुका अध्यक्ष राजकुमार मुर्गे, निलंगा तालुकाध्यक्ष चंद्रकांत डांगे,अमर मुगावे अशोक काडादी,अजय पाटील, शोभाताई सलगरे, वैशाली व्हनाळे, जळकोट तालुका अध्यक्ष शंकरराव धुळशेट्टे,बालाजी शिवशेट्टे,मुखेडचे प्रा देवशेट्टे, तसेच लिंगायत महासंघाचे उदगीर तालुकाध्यक्ष चंद्रकांत सिरसे, शहराध्यक्ष भिमाशंकर शेळके, वधुवर मेळाव्याचे अध्यक्ष डॉ रवि मुळे, कालिदास सिरसे,संजय शिवशेट्टे, विधवा पुनर्विवाह समिती रविकांत अंबेसंगे,अक्षय शिवशेट्टे,लक्ष्मण रोडगे, राजकुमार वडले,अशोक कडोळे, बापुराव शेटकार,अशोक शेटकार,संजय पांढरे, संगशेट्टी बिरादार,सौ.बबिता पांढरे, शांतवीर मुळे,भरत करेप्पा प्रभुराज कप्पीकेरे ॲड महेश मळगे, हणमंतराव बुळ्ळा,सौ.कांता बुळ्ळा हणमंत औरादे,,सुभाष शेरे,निलेश हिप्पळगे,उमाकांत द्याडे,अशोक तोंडारे, प्रकाश करेप्पा ,पंडित देवशेट्टे, यांच्यासह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी लिंगायत महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश पटणे सर यांनी प्रास्ताविक केले,तर शिवराज नावंदे, माजी आमदार मनोहर पटवारी,ॲड मल्लिकार्जुन करडखेलकर, नगराध्यक्षा सौ स्वाती हुडे,
माजी आमदार ईश्वरराव भोसीकर,व अध्यक्षीय भाषण लिंगायत महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा सुदर्शनराव बिरादार यांनी केले.तर शेवटचे आशिर्वचन मुखेडचे शिवाचार्य डॉ.विरुपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे झाले.व प्रत्यक्ष वधुवर परिचय मेळाव्यात परिचय देण्यास सुरुवात झाली.या मेळाव्यात 600 पेक्षा जास्त वधुवरांनी व एक हजारांपेक्षा जास्त पालकांनी हजेरी लावली व इतर शेकडो समाजबांधवही या मेळाव्याला उपस्थित होते. हा वधुवर मेळावा पुर्णपणे मोफत होता.
या मेळाव्याचे सुत्रसंचलन संतोष सोनवळेसर यांनी केले तर आभार लिंगायत महासंघाचे जळकोट तालुका अध्यक्ष शंकरराव धुळशेट्टे यांनी मानले.
إرسال تعليق