सर्वद फाउंडेशन तर्फे ‘सर्वद स्टार पुरस्कार २०२७’ साठी नामांकनाचे आवाहन

सर्वद फाउंडेशन तर्फे ‘सर्वद स्टार पुरस्कार २०२७’ साठी नामांकनाचे आवाहन

लातूर/ प्रतिनिधी -सर्वद फाउंडेशनतर्फे पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या सन्मानार्थ ‘सर्वद स्टार पुरस्कार २०२७ आनंद सोहळा’ तसेच ‘जीवनगौरव पुरस्कार’ आयोजित करण्यात येणार आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
शिक्षण, क्रीडा, कला, चित्रपट, सामाजिक कार्य, इतिहास, वित्त, प्रेस-मीडिया, वैद्यकीय व्यवसाय, संशोधन, साहित्य, पर्यटन, प्रशासकीय सेवा, संगीत आदी क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारांसाठी नामांकन करता येणार आहे.
नामांकन पाठविण्याची अंतिम तारीख २१ मार्च २०२७ असून पुरस्कार वितरण सोहळा जून २०२७ मध्ये सातारा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पुरस्काराचे स्वरूप आकर्षक सर्वद चिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तके, सॅश आदी असणार आहे. विशेष म्हणजे पुरस्कारासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
इच्छुकांनी आपले प्रस्ताव ८६५५९२०५७१, ९३२४३५९२२४, ७०२०२८३११६, ८६५५९२०५७० या क्रमांकांवर टाइप करून पाठवावेत किंवा admin@sarvadfoundation.org या ई-मेलवर पाठवावेत.
श्री. महादेव गोविंद रानडे, प्रमुख सल्लागार आणि डॉ. सुचिता पाटील, संचालिका, सर्वद फाउंडेशन यांनी पश्चिम महाराष्ट्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने नामांकन पाठवावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم