लातूरमध्ये रंगणार ‘स्व. पं. खंडेराव कुलकर्णी स्मृती संगीत समारोह’

लातूरमध्ये रंगणार ‘स्व. पं. खंडेराव कुलकर्णी स्मृती संगीत समारोह’
लातूर : श्रुतीनाद प्रतिष्ठान व अष्टविनायक प्रतिष्ठान, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी ‘स्व. पं. खंडेराव कुलकर्णी स्मृती संगीत समारोह’ आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ६ वाजता अष्टविनायक मंदिरातील गणेश हॉल येथे हा संगीत समारोह होणार आहे.

यंदा समारोहाचे १४ वे वर्ष असून, स्व. पं. खंडेराव कुलकर्णी यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाला अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगीताच्या प्रचार-प्रसारासाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेले पं. कुलकर्णी यांनी लातूर व परिसरातील अनेक नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले.
समारोहात पुणे येथील प्रसिद्ध बालगायिका कु. स्वरा अजित किंबहुने, पं. अपूर्वा गोखले यांच्या शिष्या, यांचे गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर श्री. अजित किंबहुने व हार्मोनियमवर सौ. मोनिका काकडे (किंबहुने) साथसंगत करतील.

उत्तरार्धात पुणे येथील युवा गायक श्री. निर्भय सक्सेना, पं. उल्हास कशाळकर यांचे शिष्य, यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यांना तबल्यावर श्री. अजित किंबहुने व हार्मोनियमवर श्री. हरिश कुलकर्णी साथ देतील.

लातूर व परिसरातील संगीतप्रेमी रसिकांसाठी हा समारोह सुरेल पर्वणी ठरणार असून, रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्व. पं. खंडेराव कुलकर्णी यांना स्वरांजली अर्पण करावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

ज्येष्ठ गायक श्री. किरण भावठाणकर, अॅड. सिद्धेश्वर धायगुडे, प्रा. शशिकांत देशमुख, श्री. हरिश कुलकर्णी, श्री. सोनू डगवाले, डॉ. संदीप जगदाळे, प्रा. परमेश्वर पाटील, प्रा. हरिसर्वोत्तम जोशी, श्री. अनिरुद्ध कुलकर्णी, शिवशाहीर श्री. संतोष साळुंके, श्री. मनोज शिवलकर तसेच श्रुतीनाद व अष्टविनायक प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी रसिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم