महिला सक्षमीकरण व आर्थिक जागरूकतेचा संदेश; लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टारचा उपक्रम उत्साहात संपन्न
पिंपरी चिंचवड : महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविणे, त्यांच्यामध्ये आर्थिक नियोजनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टारच्या वतीने महिला सक्षमीकरण व आर्थिक जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला.कार्यक्रमाच्या चेअरपर्सन लायन प्रीती बोंडे आणि लायन स्वप्निल राजपूत यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिला भगिनींसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे आयोजन, मार्गदर्शन सत्र, भोजन व्यवस्था आणि संपूर्ण कार्यक्रमाचा खर्च कुबेर फायनान्स सर्व्हिसेसचे डायरेक्टर लायन स्वप्निल राजपूत यांनी प्रायोजित केला.कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थापक लायन प्रीती बोंडे यांनी उपस्थित मान्यवरांचे आणि महिला भगिनींचे स्वागत केले. यावेळी लायन स्वप्निल राजपूत यांनी आर्थिक जागरूकतेविषयी मार्गदर्शन करताना आर्थिक नियोजन, पैशांचे योग्य व्यवस्थापन आणि आर्थिक निर्णय घेताना आवश्यक असलेली दक्षता याविषयी माहिती दिली. महिलांनी आर्थिक बाबतीत जागरूक राहून स्वतःच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहनही या मार्गदर्शनातून करण्यात आले.कार्यक्रमात लायन भक्ती बाराहाते यांनी महिलांसाठी प्रश्नोत्तरांचे सत्र घेतले. या सत्राला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सहभागी महिलांना लायन्स क्लबच्या वतीने भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी लायन वैशाली वाघचौरे यांनी आभार प्रदर्शन केले.या कार्यक्रमाला लायन डॉ. शीतल मोरे, लायन दादाराव फाटे, उद्योजिका ग्रुपचे संस्थापक लायन महेश भोई, उद्योजिका ग्रुपच्या सचिव लायन उमादेवी देसाई, भगवती फाउंडेशनच्या वैशाली खामकर, किरण गवळी तसेच ‘आपला आवाज आपली सखी’ या टीमचे सदस्य उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणे आणि योग्य आर्थिक नियोजनाचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाल्यास त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबाच्या तसेच समाजाच्या प्रगतीवर होतो, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.लायन्स क्लब ऑफ पिंपरी चिंचवड स्टारच्या अध्यक्ष लायन डॉ. प्रज्ञा देवकाते, सचिव लायन वैशाली वाघचौरे, खजिनदार लायन भक्ती बाराहाते आणि संस्थापक लायन प्रीती बोंडे यांच्या सहभागातून सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहून सहकार्य करणाऱ्या सर्व महिला भगिनी आणि मान्यवरांचे आयोजकांच्या वतीने आभार मानण्यात आले.
إرسال تعليق