राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेसाठी लातूरच्या पाच खेळाडूंची निवड
लातूर :गुरुगोविंद सिंग जिल्हा क्रीडा संकुल, नांदेड येथे पार पडलेल्या लातूर विभागस्तरीय स्पर्धेत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत, लातूरच्या जिल्हा तायक्वांदो संघटनेच्या ५ होतकरू खेळाडूंनी थेट राज्यस्तरीय स्पर्धेत धडक मारली आहे. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने मुर्तुजापुर येथे दिनांक ७ ते ९ ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धा पार पडत आहे.
या स्पर्धेमध्ये १७ वर्षांखालील वयोगटामध्ये लातूरच्या श्री केशवराज विद्यालयातील कुमारी वैष्णवी माळी व श्रावणी मोरे या दोन प्रतिभावंत खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. सदरील स्पर्धा दिनांक ८ व ९ ऑक्टोबर रोजी मुर्तुजापुर येथे होत असून, लातूरचे हे तायक्वांदो खेळाडू या राज्यस्तरीय स्पर्धेत अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करतील आणि लातूर जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करतील, असा दृढ विश्वास आशियाई तायक्वांदो प्रशिक्षक नेताजी जाधव यांनी व्यक्त केला आहे.
दिग्गजांकडून शुभेच्छांचा वर्षाव:लातूरच्या या खेळाडूंच्या उल्लेखनीय निवडीबद्दल आणि राज्य स्पर्धेतील सहभागाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक करत त्यांना भरघोस शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये लातूर विभाग क्रीडा उपसंचालक मिलिंद दीक्षित, जिल्हा क्रीडा अधिकारी जयराज मुंडे, क्रीडा विभागाचे अधिकारी, भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे पदाधिकारी, तायक्वांदो जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, तसेच खेळाडूंचे पालक यांचा समावेश आहे.
याशिवाय स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर, छत्रपती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील, देवणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णाराव खोडेवाड, श्री राजा नारायण लाहोटी इंग्लिश स्कूलचे रजिस्टार प्रवीण शिवणगीकर, तसेच क्रीडा शिक्षक प्रयागराज गरुड आणि गुरुनाथ झुंजारे यांनीही सर्व निवड झालेल्या खेळाडूंना पुढील उज्ज्वल भविष्यासाठी आणि स्पर्धेतील यशासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
إرسال تعليق