प्रा.डॉ.दयानंद उजळंबे यांना पर्यावरण जागृती प्रकृती प्रेरक पुरस्काराने सन्मानित
गंगाखेड: संत जनाबाई महाविद्यालय गंगाखेड येथील भूगोल विभाग प्रमुख तथा पर्यावरण अभ्यासक प्रा.डॉ. दयानंद उजळंबे यांना पर्यावरण जागृती प्रकृती प्रेरक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. उज्जैन येथे दिनांक 23 आणि 24 ऑक्टोबर 2026 रोजी उदयपूर येथील प्रकृती शोध संस्था आणि प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सलन्स शासकीय माधव कॉलेज उज्जैन यांच्या संयुक्त विद्यमाने सस्टेनेबल रिसोर्स मॅनेजमेंट अँड इकॉलॉजिकल रिजिलन्स या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रस्तुत परिषदेच्या उद्घाटन सत्रात देशातील नामवंत पर्यावरण तज्ञांचा पर्यावरणीय पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला प्रा. डॉ. दयानंद उजळंबे यांनी मागील 30 वर्षापासून पर्यावरण संवर्धन, प्रचार आणि प्रचारासाठी सतत कार्य करत आहेत. आकाशवाणी केंद्र परभणी येथून शेकडो पर्यावरणीय भाषणांच्याद्वारे, महाराष्ट्रातील वर्तमान पत्रात शेकडो पर्यावरणीय लेखांच्याद्वारे, देशातील महाविद्यालयात आणि विद्यापीठात पर्यावरण या विषयावर व्याख्यान देणे, महाविद्यालयात राष्ट्रीय पर्यावरण परिषदेचे आयोजन करणे, गोदावरी स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग नोंदविणे, जैवविविधतेच्या संवर्धनासाठी विशेष कार्य करणे,पर्यावरणाच्या संदर्भात पुस्तकांचे लिखाण करणे, वृक्षवेली या नियतकालिकाचा संपादक म्हणून काम करणे सोबतच त्यांनी वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतल्यामुळे त्यांना राष्ट्रीय स्तरावर पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रा. डॉ.दयानंद उजळंबे यांना या अगोदर लातूर येथील राजश्री शाहू महाविद्यालयातर्फे शाहूश्री पुरस्कार,पुणे येथील महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषदेतर्फे उत्कृष्ट भूगोलशास्त्र पुरस्कार, डेक्कन जॉग्रफिकल सोसायटी,पुणे तर्फे उत्कृष्ट भूगोल अध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
प्रस्तुत पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे संत जनाबाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आत्माराम टेंगसे सर,उपाध्यक्ष एडवोकेट रमेशराव मोहोळकर, सचिव एडवोकेट संतोष मुंढे,सहसचिव श्री दशरथ चौधरी,कोषाध्यक्ष सूर्यकांत चौधरी,संस्थेचे सर्व पदाधिकारी,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी. एम. धूत सर, उपप्राचार्य प्रा. डॉ. चंद्रकांत सातपुते,कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ.संतोष गायकवाड,कार्यालयीन अधीक्षक भारत हत्तीआंबिरे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि कर्मचारी आणि पर्यावरण प्रेमी कडून सरांचा सरांचे अभिनंदन होत आहे.
إرسال تعليق