लातूर जिल्ह्यातील रेशीम शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी सात दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाला सुरुवात
लातूर : रेशीम उद्योग विकास योजनेंतर्गत रेशीम शेतीचा विस्तार व्हावा, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची सखोल माहिती मिळून रेशीम कोष उत्पादनात वाढ व्हावी आणि त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधावी, या उद्देशाने लातूर जिल्हा रेशीम कार्यालयाच्या वतीने मांजरा कृषी विज्ञान केंद्र येथे रेशीम शेतकऱ्यांच्या लाभार्थी सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा प्रशिक्षण कार्यक्रम २५ नोव्हेंबर २०२६ ते ०१ डिसेंबर २०२६ या कालावधीत पार पडणार असून जिल्ह्यातून एकूण ७० रेशीम शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणासाठी उपस्थिती दर्शविली आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिलीप जाधव यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ अशोक जाधव, जिल्हा रेशीम विकास अधिकाकेंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञकेंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञरी गोविंद कदम, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. यादव, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ संशोधक श्री. बेद्रे तसेच निवृत्त रेशीम विकास अधिकारी विलास शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रगतिशील शेतकरी बालाजी मानमोडे, सिद्धेश्वर कागले, आकाश जाधव आणि श्रीहरी मुके यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. जाधव यांनी प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच भविष्यातील शेतीला शाश्वत व पूरक रेशीम उद्योगाची जोड असण्याची काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा रेशीम विकास अधिकारी श्री. कदम यांनी शेतकऱ्यांनी रेशीम उद्योग का करावा, याचे मूळ गमक ओळखून काम करण्याचे आवाहन केले. विविध शासकीय योजना व उपक्रमांच्या माध्यमातून जिल्हा रेशीम कार्यालय शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी सदैव तत्पर असल्याचे त्यांनी नमूद केले.
केंद्रीय रेशीम मंडळाचे शास्त्रज्ञ श्री. जाधव यांनी तुती लागवडी संदर्भात जमीन निवडीपासून ते माती परीक्षण, तुतीच्या विविध जाती, लागवड पद्धती, तुतीवरील विविध रोग व किडींचे नियंत्रण तसेच रेशीम कीटक संगोपन या विषयावर मार्गदर्शन केले. जागतिक बाजारपेठेत रेशीम कोषाला वाढती मागणी असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी या फायदेशीर उद्योगाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.
निवृत्त रेशीम विकास अधिकारी श्री. शिंदे यांनी रेशीम उद्योग हा पारंपरिक शेतीसोबतच एक अत्यंत लाभदायी शेतीपूरक उद्योग असल्याचे नमूद केले.
إرسال تعليق