केशरबाई भार्गव शाळेत 'संविधान दालनाचे' उद्घाटन; दीपरत्न निलंगेकर व राहुल लोंढे यांची उपस्थिती
या संविधान दालनात संविधान विषयक मूलभूत माहिती देणारे भित्तीपत्रक, छायाचित्र, हस्तलिखित यांची मांडणी करण्यात आली होती. या सोबतच संविधान विषयक प्राथमिक माहिती देणाऱ्या पुस्तकांचेही प्रदर्शन भरविण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना संविधान विषयक मूलभूत व प्राथमिक माहिती व्हावी व संविधानाचे महत्त्व अधोरेखित व्हावे या प्रमुख उद्देशाने हे दालन भरविण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांनी या संविधान दालनास भेट देऊन त्यातील विविध साधनांचे निरीक्षण केले व लिखित मजकुराचे वाचनही केले.
या कार्यक्रमाचे उद्घाटक दीपरत्न निलंगेकर यावेळी म्हणाली की, संविधान हा केवळ ग्रंथ नसून जीवन जगण्याची पद्धत आहे. विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, नियमांचे पालन करणे इत्यादी चांगल्या सवय रुजवण्यासाठी अशा उपक्रमाची गरज आहे. यावेळी राहुल लोंढे म्हणाले की, संविधानासारखा विषय चित्र, भित्तीपत्रक या माध्यमातून मुलासमोर मांडता आला तर संविधानाचे आकलन शालेय विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल.
संस्था सदस्य लक्ष्मीरमण लाहोटी , शैलेश लाहोटी,ॲड आशिष बाजपेयी, कमलकिशोर अग्रवाल यांनी या उपक्रमात शुभेच्छा दिल्या असून, या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुक्मिणी सलगरे, अंजना फुले, कल्पना भट्टड,श्रीदेवी कावळे, सरिता मोरे, प्रियंका जमादार, रेश्मा अडाणे , कांचन शिरसाटे यांनी प्रयत्न केले.
إرسال تعليق