श्री वेताळेश्वर शिक्षण संकुल्नातमध्येस्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

. श्री  वेताळेश्वर शिक्षण संकुल्नातमध्येस्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा




लातूर -
  भारत आजादी का अमृत महोत्सव   ७५  स्वातंत्र  दिनानिमित्त महाविद्यालयात ध्वजारोहण करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लातूर येथील गोजमगुंडे हॉस्पिटलचे संस्थापन डॉ  दत्ता गोजमगुंडे,  डॉ प्रणिता ताई चाकूरकर , संस्थेचे अध्यक्ष  भीमाशंकर बावगे ,सचिव वेताळेश्वर बावगे  संस्थेचे कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे, ज्ञानसागर विद्यालयाचे मुख्यदापक कालिदास गोरे, प्राचार्य डॉ.श्यामलीला बावगे (जेवळे ),डॉ  मेश्राम वीरेंद्र इत्यादी मान्यवर  उपस्थित होते.लातूर येथील गोजमगुंडे हॉस्पिटलचे संस्थापन डॉ  दत्ता गोजमगुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे  आयोजन  व रॅली काढण्यात अली आणि या रॅली मध्ये सर्व महाविद्यालयातील विध्यार्थी सहभाग घेतला.स्वातंत्र   लढा हा फक्त वीर जवानांनी नाही तर सर्व सामान्य नागरिकांनी पण दिला पाहिजे ,   स्वच्छ भारत मोहीम राबवली पाहिजे ,प्लास्टिक चा वापर नाही केला पाहिजे ,आपल्या हेल्दी आरोग्य कशापद्धतीने ठेवता येईल आणि प्रत्यकाने देशासाठी जास्तीत जास्त वेळ दिला पाहिजे असे प्रतिपादन डॉ प्रणिता ताई चाकूरकर यांनी केले .                                 तसेच  संस्थेचे कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे यांनी  आजच्या वाढत्या व धावपळीच्या जीवनात मनुष्य म्हणून स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही त्यासाठी प्रत्येकानी स्वतःला वेळ देयला शिका निरोगी रहा असे मोलाचे मार्गदर्शन केले.त्याच बरोबर आज सीमेवरती वीर जवान आहेत म्हणून देश सुखरूप आहे पण जे जेवान देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा जवानांच्या घरी जाऊन त्यांच्या सुख दुःखात सहभागी झाले पाहिजे हि सुद्धा देश सेवा आहे असे प्रतिपादन संस्थेचे सचिव वेताळेश्वर बावगे यांनी केले स्वातंत्र दिनानिमित्त महाविद्यालयात वेगवेगळे रंगभूषा,वेषभूशा   भाषण स्पर्धा, नृत्य स्पर्धा असे विविध स्पर्धे चे आयोजन करण्यात आले .  
     लातूर  कॉलेज ऑफ  फार्मसी हासेगाव महाविद्यालयासह ज्ञानसागर विद्यालय हासेगांव, लातूर कॉलेज ऑफ डी फार्मसी  लातूर, राजीव गांधी पॉलिटेक्निक कॉलेज हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ औधोगिक प्रशिक्षण संस्था हासेगाव, गुरुनाथ  अप्पा बावगे इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल हासेगाव, लातूर कॉलेज ऑफ सायन्स लातूर या सर्व युनिट चे प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विध्यार्थी  उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानशी हंकारे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्राचार्य नंदकिशोर बावगे यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم