स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केशवराज शैक्षणिक संकुलात व्याख्यान
लातूर /प्रतिनिधी :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येथील श्री केशवराज शैक्षणिक संकुलात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर ॲड.संजीव देशपांडे यांचे व्याख्यान संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष अनिल अंधोरीकर तर मंचावर भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे उपाध्यक्ष जितेश चापसी,केंद्रीय कार्यकारिणी सदस्य प्रविण सरदेशमुख,संजय गुरव व विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील वसमतकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरूवात संपूर्ण वंदे मातरमने झाली.यावेळी बोलताना संजीव देशपांडे म्हणाले की,भारत हा सनातन चिरंजीवी व चिरंतन देश आहे.भारतीय संस्कृतीची विचारधारा लाभलेला व उज्ज्वल परंपरेचा इतिहास असलेला हा देश नक्कीच विश्वगुरू होणार.या देशाची माती,संस्कृती पावन आहे. संशोधनात्मकता हा मूळ स्वभाव लाभलेली संस्कृती पुढे नेण्यासाठी व भारताच्या अखंडत्वासाठी सर्वांनी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन संजीव देशपांडे यांनी यावेळी केले.
अध्यक्षीय समारोपात अनिल अंधोरीकर म्हणाले की,
अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती करून भारताचे अखंडत्व जपता येते. आध्यात्मिक शक्ती ही भारताची मूळ शक्ती आहे.भारतीय तत्वज्ञानाला जगाच्या पाठीवर नेण्याचा प्रयत्न भगवद्गीतेच्या माध्यमातून योगी अरविंद यांनी केला,असे मत अंधोरीकर यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय कुलकर्णी यांनी केले.१५ ऑगस्ट रोजी योगी अरविंद घोष यांची १५० वी जयंती सर्वत्र साजरी होत असल्याचे औचित्य म्हणून योगी अरविंदांच्या जीवन कार्याचा थोडक्यात परिचय बबन गायकवाड यांनी करून दिला. संगीत शिक्षक संतोष बीडकर यांनी वैयक्तिक पद्य सादर केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन वैशाली फुलसे यांनी केले.कांचन तोडकर यांच्या कल्याण मंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे उपमुख्याध्यापक बालासाहेब केंद्रे,पर्यवेक्षक दिलीप चव्हाण, संदीप देशमुख,
अंजली निर्मळे,अभ्यास पूरक मंडळ प्रमुख शैलजा देशमुख, कार्यक्रम प्रमुख शिवशंकर राऊत, सहप्रमुख आदिनाथ कदम तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

إرسال تعليق