लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित पात्र युवकांसाठी दयानंद कॉलेज मध्ये रोजगार मेळावा;76 कंपन्याचा सहभाग, 1708 पदासाठी भरती

 लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित पात्र युवकांसाठी दयानंद कॉलेज मध्ये रोजगार मेळावा; 76 कंपन्याचा सहभाग, 1708 पदासाठी भरती


लातूर-लातूर जिल्हा शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेला आहे, त्या मानाने रोजगाराच्या संधी उपलब्ध नाहीत या गोष्टीचा विचार करुन बाहेरच्या कंपन्यांना बोलावून लातूरमध्ये रोजगार मेळावा घेण्याचा जिल्हा प्रशासनाने निर्णय घेतला असून दिनांक 28 ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, लातूरच्यावतीने दयानंद महाविद्यालय सभागृहात" पंडित दिनदयाल उपाध्याय"' रोजगार मेळाव्याचे सकाळी 10 वाजल्यापासून आयोजन केले आहे. वेगवेगळ्या 76 उद्योग/ कंपन्या या मेळाव्यात सहभागी होत आहेत. पात्र युवकांनी या मेळाव्यात येवून या संधीचा फायदा घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी केले आहे. या मेळाव्यात रोजगार देणारे लातूर जिल्ह्यातील एकूण 65 आस्थापना / उद्योक यांची एकूण 598 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. तसेच पुणे, औरंगाबाद, हैद्राबाद येथील एकूण 11 आस्थापना / उद्योजक यांनी 1 हजार 110 रिक्त पदे अधिसुचित केली आहेत, असे एकूण 1 हजार 708 रिक्त पदे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन केंद्र लातूर या कार्यालयास उपलब्ध झालेला आहे.  
लातूर जिल्हयातील प्रमूख आस्थापना  शिव मोटार्स, याम्हा शोरुम, (Shiv Motors Yamaha Showroom), एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स, (HDFC Life Insurance), एलआयसी ऑफ इंडिया, अविनाश इंजीनीअरींग, (LIC of India, Avnish Engineering) प्राईमवन डिलेव्हरी ऑफिस,(Primeone Delivery Office) प्राईम डिलेव्हरी ऑफीस, (Amazon Delivery Boy)  &  Kirti Gold अमेझॉन डिलेव्हरी बॉय अँन्ड किर्ती गोल्ड,  तसेच इतर काही लातूर शहरातील प्रमुख आस्थापना यांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. 
तसेच  पुणे, औरंगाबाद, हैदराबाद येथील नामांकीत आस्थापना महेंद्रा अँन्ड महेंद्रा लिमीटेड,पुणे (Mahindra & Mahindra Ltd. Pune), वैभव फुड पुणे (Vaibhav Food Pune), ब्रेनसिटर इंडिया प्रायव्हेट लिमीटेड पुणे (Brainsitter India Pvt.Ltd. Pune), फियाट इंडिया ॲटोमोबॉईल्स, प्रायव्हेट लिमीटेड रांजनगाव,  पुणे (Fiat India Automobiles Pvt.Ltd.Ranjangaon Pune), याझाकी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड वाघोली, पुणे (Yazaki India Pvt.Ltd. Wagholi, Pune), मेहेंद्रा चाकण, पुणे (Mahindra Chakan Pune), एसएमपी ग्रुप, पुणे (SMP Group Pune), बिडवे इंजिनिअरींग लिमीटेड, औरंगाबाद (Badve Engineering Ltd Aurangabad), धुत ट्रान्समिशन औरंगाबाद ॲन्ड तोशीबा संगारेड्डी, हैद्राबाद (Dhoot Transmission Aurangabad & Toshiba Sangareddy Hyderabad)  या नामांकीत कंपन्यांनी रिक्त पदे अधिसुचित केली आहेत.या साठी दहावी, बारावी, ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, आय.टी.आय. (All Trade) / डिप्लोमा / बी.ई. इत्यादी शैक्षणिक पात्रतेसाठी आवश्यक मनुष्यबळाची आवश्यकता आहे.वरील सर्व नामांकीत कंपनीतील उद्योजकांची रिक्तपदे निहाय इच्छूक उमेदवारांनी दिनांक 28 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता  दयानंद महाविद्यालय सभागृह, बार्शी रोड, लातूर येथे स्वखर्चाने मुलाखतीकरीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे स्वत:चा रिझ्युम / बायोडाटा / पासपोर्ट फोटोसह  उपस्थित रहावे. व या सुवर्ण संधीचा लातूर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा. असे अवाहन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्र, लातूर  यांनी केले आहे.
अधिक माहिती करिता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,मार्गदर्शन केंद्र, या कार्यालयाच्या 02382- 299462 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असेही पत्रकात नमुद केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم