शारदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात
लातूर(प्रतिनिधी)- येथील शारदा इंटरनशनल स्कूलमध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. स्कूलचे प्राचार्य डॉ. अभिषेक शर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या डॉ. वैशाली पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी महापुरूषांविषयी भाषणे केली, देशभक्तीपर समूह गीत गायन, नृत्य सादर केले. आजचे विद्यार्थी हे उद्याच्या भारताचे भविष्य आहेत, प्रत्येकाने चांगले शिक्षण घेऊन स्वतःच्या कुटुंबासह देशविकासासाठी हातभार लावावा, असे आवाहन डॉ. वैशाली पाटील यांनी यावेळी केले.
प्राचार्य डॉ. अभिषेक शर्मा यांनी भारत, इंडिया या शब्दाच्या उत्पत्तीमागील इतिहास सांगून सर्वांकडून प्रतिज्ञा म्हणवून घेतली.
यावेळी दहावीच्या परीक्षेतील गुणवत्तायादीत आलेल्या विद्यार्थी व पालकांसह ऑलिंपियाड परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. एम. आर. पाटील, शालेय प्रशासक एल. एम. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी उपाध्याय यांनी केले. आभार समन्वयक शीला शेळके यांनी मानले.
إرسال تعليق