जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित निबंध स्पर्धेत 'केशवराज' चे यश
लातूर /प्रतिनिधी:आजादी का अमृत महोत्सव निमित्त 'स्वराज्य महोत्सव स्पर्धा अंतर्गत लातूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झालेल्या निबंध स्पर्धेत श्री केशवराज माध्यमिक विद्यालयातील सिद्धी कलुरे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकावला.
शहरातील विविध शाळांच्या ४६ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.सिद्धी कलुरे हिच्या या यशाबद्दल लातूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ,जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त गिरी,शिक्षण विस्तार अधिकारी संजय पारसेवार,जिल्हा समन्वयक विवेक सौताडेकर तसेच भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे सर्व पदाधिकारी,शाळेचे मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक,सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेसाठी शाळेतील शिक्षिका रेणुका गिरी,स्मिता मेहकरकर,सर्व वर्गशिक्षक यांनी परिश्रम घेतले.

إرسال تعليق