रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर सेंट्रलच्या वतीने आयोजित आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून चाकूर तालुक्यातील केंद्रेवाडी येथे रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर सेंट्रल व केंद्रेवाडी ग्रामपंचायतच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर मोफत आरोग्य शिबिर केंद्रेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेत घेण्यात आले. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी रोटरॅक्ट क्लब ऑफ लातूर सेंट्रलचे अध्यक्ष वैभव बेल्लाळे, सचिव सोमेश कान्नव , प्रोजेक्ट चेअरमन आदित्य शास्त्री, चैतन्य मोरे, क्लब आरसीसी गिरीश ब्याळे , पुरुषोत्तम सोनी, क्लब मेंबर ईश्वर तेरकर, रोहन मुंदडा, ऋषिकेश नागरगोजे, चेतन मुंडे, ऋषिकेश , केंद्रेवाडीच्या सरपंच सावित्रा दगडू केदार, उपसरपंच राम केंद्रे, विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा. चेअरमन प्रतीक दगडू केदार, तंटामुक्ती अध्यक्ष माऊली केदार, स्वस्त धान्य दुकानाचे चेअरमन गुरुनाथ मुंढे, मुख्याध्यापक नेवाळे, सहशिक्षक माटलाकुटे यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
या शिबिरात डॉ. संतोष बजाज, डॉ. उषा ब्याळे , डॉ. प्रियंका वडजे, डॉ. पवन खिचडे , डॉ. पल्लवी खंदारे या तज्ज्ञ डॉक्टर्सनी रुग्णांची तपासणी व उपचार केले. या शिबिरात महिलांचे विविध आजार, मुळव्याध , दंत रोग, बालरोग, त्वचारोग, मूत्राशयाचे विकार आडे व्याधींच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली. ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ मोठ्या संख्येने घेतला.

إرسال تعليق