पोहरेगाव ग्रामपंचायतीच्या पुढाकारातून ९० महिला आत्मनिर्भर
पोहरेगाव येथील काही महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याची इच्छा ग्रामपंचायतीकडे व्यक्त केली होती.त्यानुसार सरपंच गंगासिंह कदम यांनी माणदेशी फाउंडेशनशी संपर्क साधून प्रशिक्षणाची सुविधा गावात उपलब्ध करून दिली. त्यासाठी आवश्यक असणारे ५१ हजार रुपयांचे शुल्क ग्रामपंचायतीने भरणा केले. माणदेशी फाउंडेशनने २ महिने महिलांना प्रशिक्षण दिले.या अंतर्गत ६० महिलांनी शिवणकाम तर ३० महिलांनी ब्युटी पार्लरचे प्रशिक्षण घेतले.दोन महिने चाललेल्या या प्रशिक्षणाचा नुकताच समारोप झाला.यावेळी माणदेशी फाउंडेशनच्या वतीने प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र तसेच व्यवसाय करण्यासाठी आवश्यक असणारे किट वाटप करण्यात आले.ग्रामपंचायतीच्या वतीने प्रशिक्षण देणाऱ्या माणदेशी फाउंडेशनच्या भगिनींचा सत्कारही करण्यात आला. सरपंच गंगासिंह कदम व ग्राम विकास अधिकारी डी.आर.कांगणे यांची यावेळी उपस्थिती होती.प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या महिलांनी व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा संकल्प यावेळी बोलताना व्यक्त केला.

إرسال تعليق