अमेरिकेतील फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये 'बनी'चे स्क्रिनिंग!

                 अमेरिकेतील फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय                                 फेस्टिव्हलमध्ये 'बनी'चे स्क्रिनिंग!

जगभरातील तीस देशांतील चित्रपटांतून निवडलेला एकमेव मराठी चित्रपट!!

जगभरातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांपैकी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या अमेरिकेतील फोर्थ स्मिथ आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हलमध्ये निर्माते शंकर धुरी यांच्या आकृती क्रिएशन्स’ निर्मित आणि निलेश उपाध्ये लिखित दिग्दर्शित 'बनीया एकमेव मराठी चित्रपटाची निवड झाली आहे. 'बनी'चे स्क्रिनिंग येत्या २७ ऑगस्ट २०२२ रोजीसायंकाळी ७:२० वा. टेम्पल लाइव्ह येथे होणार आहे. तीस देशांतील शेकडो चित्रपटांच्या प्रवेशिका या महोत्सवासाठी विचारधीन होत्यात्यातून १३७ चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात राष्ट्रीय भाषेतील 'गुठली लड्डूआणि मराठीतील 'बनीया दोन भारतीय चित्रपटांची निवड झाली असून येत्या २६ व २७ ऑगस्ट २०२२ रोजी हा महोत्सव अमेरिकेतील आर्कान्साफोर्ट स्मिथयूएसएसंपन्न होणार आहे. साय-फायड्रामाकॉमेडीथ्रिलरऍक्शनसह इतर अनेक शैलींतील ३० हून अधिक देशांच्या विविधरंगी संस्कृती आणि परंपरांचे दर्शन ‘फोर्थ स्मिथ’च्या 'बॉर्डरलँड्समध्ये दर्शन होणार आहे.

‘बनी’ चित्रपटाच्या कथानकाबद्दल लेखक दिग्दर्शक निलेश उपाध्ये सांगतात "विवेक नावाच्या व्यक्तीने १० वर्षाच्या बनीला जगापासून दूरअलिप्त ठेवले आहे. असे करण्यामागे त्याचे स्वत:चे अनेक तर्क आणि कारणे आहेत. कालांतराने बनी जगाकडे विवेकच्या नजरेतून बघू लागते. तो जे सांगेल त्याला ती खरे मानू लागते. परंतू त्याच वेळी बनीचे स्वत:चेही विश्व तयार होत आहे. आणि कालांतराने विवेक आणि बनीचा हा प्रवास एका धोकादायक वळणावर येऊन पोहोचतो. बनी हा चित्रपट सामाजिक-मानसिक थरारपट असून आजच्या ज्वलंत सामाजिक विषयासंबंधित आहे."

अनेक यशस्वी चित्रपटांच्या कार्यकारी निर्मितीची धुरा सांभाळणाऱ्या शंकर धुरी यांचे निर्माता म्हणून हे प्रथम पदार्पण आहे. चित्रपटाच्या या यशाबद्दल ते म्हणतात, "विलक्षण कथा आणि उत्तम टीमवर्कमुळे आज 'बनीसातासमुद्रापलीकडे पोहोचली आहे. नवोदित दिग्दर्शक निलेश उपाध्ये यांच्या सृजनशील विचारांनी अत्यंत वेगळ्या धाटणीचा विषयदिग्दर्शकाच्या मनातील हे तरल भावोत्कट नाट्य सिनेमॅटिक अँगलने डीओपी कार्तिक काटकर यांच्या मार्फत प्रेक्षकांपर्यंत पोहचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत असे म्हणता येईल."

बनीच्या शीर्षक भूमिकेत बालकलाकार सान्वी राजे सोबत शैलेश कोरडे व शीतल गायकवाड या कसदार कलाकारांनी प्रमुख भूमिका समरसून निभावली आहे. कलादिग्दर्शन अनिल वाठ यांनी केलं असून साउंड डिझाईन अभिजीत श्रीराम देव यांचे आहे. बनीचं संकलन योगेश भट्ट याचं असून पार्श्वसंगीत अक्षय एल्युरीपटी यांनी दिलं आहे. स्थिरचित्रण निखील नागझरकर यांनी केले असून सहाय्यक दिग्दर्शन विशाल पाटीलसुनील जाधव याचं आहे. वेशभूषाकार पल्लवी दळवीकेशभूषा प्रफुल्ल कांबळेस्वाती थोरातरंगभूषाकार ललित कुलकर्णी, डीआय हितेंद्र परब तर प्रोमो डिझाईन पंकज सपकाळे यांनी केले आहेत. कार्यकारी निर्माता दिगंबर बोईवारलाईन प्रोडूसर विजय देवकरनिर्मिती सूत्रधार महादेव शिंदेयासीन आली, प्रसिद्धी डिझाईन्स सचिन डागवालेसोशल मीडिया मॅनॅजमेन्ट समीर भोसलेप्रसिद्धी प्रमुख राम कोंडीलकरफेस्टिव्हल कॉर्डीनेशन मोहन दास यांचे आहे.

Post a Comment

أحدث أقدم