राष्ट्रभक्ती ले हृदय में कार्यक्रम दयानंद कला महाविद्यालयात संपन्न

                राष्ट्रभक्ती ले हृदय में कार्यक्रम  दयानंद कला महाविद्यालयात संपन्न



लातूर-आजादी का अमृत महोत्सव व स्वराज्य सप्ताह निमित्त दयानंद कला महाविद्यालयात 'राष्ट्रभक्ती ले हृदय मे' या राष्ट्रभक्तीपर गीताचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी दयानंद कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड यांच्या शुभहस्ते थोर क्रांतीकरक भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. उपप्राचार्य डॉ. प्रशांत मान्नीकर, कमवी उपप्राचार्य अनिलकुमार माळी, आझादी का अमृत महोत्सव समिती महाविद्यालय प्रमुख डॉ.संतोष पाटील, आजादी का अमृत महोत्सव जिल्हा समिती सदस्य डॉ.अंजली जोशी व डॉ. संदीपान जगदाळे, डॉ. आर. एस. पारवे, डॉ. पी.एस. सूर्यवंशी, संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते.
      प्रारंभी 'राष्ट्र की जय चेतना का गाण वंदे मातरम' हे गीत दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केले. त्यानंतर 'तेरे मिट्टी में मर जावाँ' हे गीत चिरं
जीव अधिराज जगदाळे याने सादर करुन विद्यार्थ्यांना रोमांचित केले. अनमोल कांबळे यांनी 'संदेसे आते है' हे गीत सादर करून सैनिकांची मनोभावना व्यक्त केली. त्यानंतर समूहाने 'दिल दिया है, जान भी देंगे ए वतन तेरे लिए' हे गीत सादर करून राष्ट्रभक्तीचे दर्शन घडविले. 'माँ तुझे सलाम' हे गीत ऋषी कांबळे यांने सादर केले. तर प्रियंका बनसोडे हिने 'ये मेरे वतन के लोगो' गीत सादर करून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. 'भारत वंदे मातरम' या समूहगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

      कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगीत विभाग प्रमुख डॉ. देवेंद्र कुलकर्णी, डॉ.संदीपान जगदाळे,प्रा. शरद पाडे,प्रा.सोमनाथ पवार, सुरज साबळे,पूजा माळी,आनंत खलुले यांनी मोलाचे योगदान दिले.
     राष्ट्रभक्ती ले हृदय में या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم