कुमारस्वामीमध्ये मराठी विभागाचे विविध उपक्रम

 कुमारस्वामीमध्ये मराठी विभागाचे विविध उपक्रम


औसा: स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री कुमारस्वामी महाविद्यालयामध्ये मराठी विभागाच्यावतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना खुलत जावी म्हणून देशभक्तीपर  गीत गायन, देशभक्तीपर काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य विकसित व्हावे म्हणून "प्रणाम भारत" हे भित्तिपत्रक काढण्यात आले. यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील अनेक क्रांतिकारकांची माहिती, देशभक्तीपर कविता लिहून सहभाग घेतला. सदर भित्तिपत्रकाचे उद्घाटन रवींद्रनाथ महाराज यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी श्री महंतस्वामी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ह.भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर, सचिव गिरीश पाटील, सहसचिव सुभाषप्पा मुक्ता, उपाध्यक्ष बाबुअप्पा उटगे, बसवराज वळसंगे, प्रा. मोहम्मद हनिफ आलूरे, सुधाकर पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. सदर भित्तिपत्रकासाठी बालाजी जाधव, मंगेश गाडेकर यांनी डॉ. सुधीर गरड आणि प्रा. राजकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले. गीत गायन व काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. युवराज धसवाडीकर, प्रा. अंबादास खिलारे यांनी काम पाहिले. या उपक्रमाबद्दल प्राचार्य डॉ. महेश्वर बेटकर, उपप्राचार्य डॉ. सुभाष मिसाळ प्रा. रवींद्र कारंजे, डॉ. अनिल कांबळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

Post a Comment

أحدث أقدم