श्री त्रिपुरा विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आझादी का अमृत
महोत्सव - तिरंगा रॅली वस्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
लातूर.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर येथील लातूर पॅटर्नचा चेहरा असणारे प्रा. उमाकांत होनराव यांच्या श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व रिलायन्स लातूर पॅटर्न च्या वतीने श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय, अंबाजोगाई रोड ते राजीव गांधी चौकापर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. साधारणतःदोन हजार विद्यार्थ्यांची भव्य रॅली काढण्यात आली, या भव्य रॅलीमध्ये सर्व विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेत्तर वर्ग सहभागी झाले होते.श्री त्रिपुरा कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय व रिलायन्स लातूर पॅटर्न ही शिक्षण संस्था देशात उत्तम शिक्षणासोबत, उत्तम संस्कार आणि देश भक्तीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवण्याचे कार्य मागील १८ वर्षांपासून प्रभावीपणे करत आहे. या भव्य रॅलीचे आयोजन संस्थेचे अध्यक्ष मा.उमाकांत होनराव सरांच्या मार्गदर्शनाखाली झाले. रॅलीमध्ये संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कोषाध्यक्षा प्रा. प्रेरणा होनराव व कार्यकारी संचालक ओंकार होनराव तसेच प्रा.मनोहर कबाडे, उपप्राचार्य राजकुमार केदासे, प्रा.ज्ञानेश्वर पुरी,प्रा. श्रीकृष्ण जाधव व सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. ही रॅली यशस्वी होण्यासाठी सर्वांनी अथक परिश्रमाने व उत्साहाने उत्तम व शिस्तबद्ध आयोजन केलेहोते. रॅलीच्या समारोप दरम्यान प्रा. होनराव सरांनी शिवाजीनगर पोलीस स्टेशन, वाहतूक नियंत्रण शाखा व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे विशेष आभार मानले. ७५ व्या स्वातंत्र्य दिना निमित्त मान्यवऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी NDA बॅच च्या विद्यार्थ्यांनी चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थिथांचे मने जिंकली व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्ती विषयावर पटकथा सादर करून प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागृत केली. तसेच महाविद्यालयातर्फे आयोजित विविध स्पर्धांचे पारितोषिक मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. पंडित रेजितवाड (पोलीस उपाधीक्षक ACB लातूर) व त्यांचे सहकारी, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा उमाकांत होनराव, संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सौ. सुलक्षणा केवळराम, कोषाध्यक्षा प्रा. प्रेरणा होनराव व कार्यकारी संचालक ओंकार होनराव तसेच वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य उमाकांत बिराजदार, प्रा. मनोहर कबाडे, उपप्राचार्य राजकुमार केदासे, प्रा. ज्ञानेश्वर पुरी, प्रा. श्रीकृष्ण जाधव, सर्व विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते
إرسال تعليق