लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात वर्कशॉपचे उद्घाटन

लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयात वर्कशॉपचे उद्घाटन 



 लातूर - 
श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचलित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयांमध्ये  CME on clinical Perspective in Community Based Rehabilitation या विषयावर कार्यशाळांचे  आयोजिन  केले या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले  आहे. या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून मॉडर्न कॉलेज ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय, पुणे डॉ. शितल  बाम्हणे हे तज्ञ म्हणून उपस्थित होते यांचा सत्कार डॉ.पल्लवी तायडे  यांनी शाल व श्रीफळ देऊन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.विरेंद्र मेश्राम यांनी केले .विद्यार्थ्यांना "सध्याच्या व भविष्यामध्ये फिजिओथेरपी  क्षेत्रामध्ये खूप  महत्त्व आहे  मानवी धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक मनुष्याला मणक्याचा व हाडाचा आजार उद्भूत आहे त्यासाठी येणाऱ्या काळामध्ये फिजिओथेरपीची काळाची गरज आहे व जास्तीत जास्त विद्यार्थ्याने या क्षेत्रामध्ये  संधी च सोन करावे असे मार्गदर्शन डॉ. शितल  बाम्हणे यांनी केले   तसेच विद्यार्थ्यांनी  कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर महाविद्यालय व संस्था तुम्हाला कसल्याही प्रकारची कमी पडणार नाही महाविद्यालयात अत्याधुनिक साधने उपलब्ध आहेत तरी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे नाव करावे" असे संस्थेची कोषाध्यक्ष श्री शिवलिंग जेवळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाला तृतीय व अंतिम वर्षाचे व पदवीत्तर विद्यार्थी  सहभागी होते तसेच कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष भीमाशंकर आप्पा बावगे , सचिव  वेताळेश्वर बावगे, कोषाध्यक्ष शिवलिंग जेवळे आणि शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. धनश्री शिंदे यांनी केले .

Post a Comment

أحدث أقدم