नेहरू कप हॉकी स्पर्धेत कॉक्सिटचे दोन्ही संघ द्वितीय

                           नेहरू कप हॉकी स्पर्धेत कॉक्सिटचे दोन्ही संघ द्वितीय

 लातूर- बाभळगावच्या दयानंद महाविद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय हॉकी कप क्रीडा स्पर्धेत येथील कॉक्सिट ज्युनिअर कॉलेजच्या मुलींसह मुलांच्याही संघाने द्वितीय क्रमांक पटकावला.
 मुलांच्या संघात सौरव नयने, अबेद रजवी, ओमकार पवार, ओम देवंड, प्रतीक जाधव, प्रणव जोशी, रिजवान शेख, अभिमन्यू जाधव, अर्थव हंगरगेकर, आवेज तांबोळी, अनिकेत गायकवाड, गणेश गायकवाड,सूर्यकांत बरबडे, अशोक अन्नगिरे, रोहन पवार, फराहन शेख, विद्यासागर पुरी, राहुल भालेराव, अभय चाटे, प्रतीक मुकडे, शुभम आरदवाड यांचा समावेश आहे. मुलींच्या संघात गायत्री जाधव, स्नेहा कदमापूर, प्राची नरहरे, अस्मिता मुस्कवाड, मोगिका जाधव, वर्षा देवकुळे, सानिका बिरले, स्मिरत शेख, श्‍वेता जोशी, सुजाता सूर्यवंशी, धनश्री पटाडे, साक्षी गेडवार, पल्वी राठोड, बरीर शेख, स्नेहा जतरा, स्वती पवार, सुविधा पवार यांचा समावेश आहे.
 याबद्दल रॉयल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक डॉ. एम. आर. पाटील, प्राचार्या तब्बसूम मोमीन, क्रीडा शिक्षक बी. बी. देवडे, प्रा. भोगावकर, स्वाती आवाड, प्रा. स्मिता पाटील यांनी अभिनंदन केले आहे.  

Post a Comment

أحدث أقدم