टाकळगाव येथील बन्सी घवले यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

                     टाकळगाव येथील बन्सी घवले यांचा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश


 

लातूर-लातूर तालुक्यातील टाकळगाव येथील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते बन्सी छबुअप्पा घवले यांनी सहकाऱ्यासह काँग्रेस पक्षामध्ये लातूर येथे प्रवेश केला. यावेळी त्यांनी पुर्वी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता होतो पक्षापासून दूर गेलो होतो, आता काँग्रेस पक्षाचा सक्रीय कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे सांगितले.

यावेळी बन्सी छबुअप्पा घवले आणि त्यांच्या सहकारी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतल्या बददल त्यांचे लातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुभाष घोडके, ट्वेंटीवन शुगर लि; मळवटीचे व्हा.चेअरमन विजय देशमुख, विलास साखरचे व्हा. चेअरमन रवी काळे यांनी स्वागत केले.

पक्षप्रवेशाप्रसंगी घवले म्हणाले की, मी पूर्वी काँग्रेस पक्षाचाच कार्यकर्ता होतो परंतू मधल्या काळात पक्षापासुन दुर गेलो होतो आणि आता परत मी सक्रिय काँग्रेस पक्षाचे काम करण्याचा निश्चय करून काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला आहे. सहकारमहर्षी माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब, राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासराव देशमुख साहेब यांच्यासाठीच पुढील काळात काम करणार असल्याचे बन्सी घवले म्हणाले, त्यांचे सोबत संतोष पाटील धनेगावकर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم