लंडनची संशोधन स्कॉलरशीप अभिषेक भोसले यांना प्राप्त

                
                        लंडनची संशोधन स्कॉलरशीप  अभिषेक भोसले यांना प्राप्त


लातूर- लंडन येथील स्कूल ऑ. ओरिएंटल अँड आङ्ग्रिकन स्टडिजची संशोधन शिष्यवृत्ती लातूरचे (गांजूर)सुपूत्र अभिषेक विश्‍वंभर भोसले यांना  जाहीर झाली आहे. या स्कॉलरशीप अंतर्गत ते पीएचडी पूर्ण करणार आहेत.शिक्षक नेते कॉ.विश्‍वंभर भोसले यंाचे ते चिरंजीव आहेत.अभिषेक भोसले यांचे शालेय व माध्यमिक शिक्षण व्यंकटेश आणि उच्च माध्यमिक शिक्षक राजर्षी शाहू महाविद्यालयातून झाले आहे. ते सातत्याने दलित, आदिवासी समूहाचा माध्यमातील सहभाग आणि विकास या विषयावर लेखन करत आले आहेत. डेव्हलपमेंट कम्युनिकेशन या विषयात काम करतात तसेच पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विषयाचे पुण्यात अध्यापन करतात .या स्कालरशीप अंतर्गत ते आंबेडकरी चळवळीतील विकासाची संकल्पना आणि त्यातील विकास संज्ञापणाच्या प्रारुपाचा ते अभ्यास करणार आहेत.
पुणेच्या सावित्रीबाई ङ्गुले विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्र विद्या विभागातून त्यांनी पत्रकारिता व जनसंज्ञापन विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून,त्यानंतर इनाडू या माध्यम संस्थेत काही काळ सेवा केली आहे. सावित्रीबाई ङ्गुले विद्यापीठातून अध्यापनास सुरुवात केली असून, औरंगाबाद एमजीएम पत्रकारिता व संज्ञापन महाविद्यालय, पुणे एमआयटी विद्यापीठ व विश्‍वकर्मा विद्यापीठातही अध्यापन केले आहे.तसेच सिंबॉयसिस विद्यापीठात अतिथी प्राध्यापक म्हणून काम केले आहे. २०१८ मध्ये त्यांना सन्टेनेबल डेव्हलपमेंट विषयात काम करण्यासाठी इंडोनेशिया येथील सेपुला नोपेंबर इन्स्टिट्युट ऑङ् टेक्नॉलॉजी या संस्थेची स्कॉलरशीप मिळाली आहे.
अभिषेक भोसले यंाना मिळालेल्या संशोधन शिष्यवृत्तीबद्दल ऍड.मनोहर गोमारे, ऍड.उदय गवारे, अतुल देऊळगावकर, डॉ.संग्राम मोरे, प्राचार्या कुसूम मोरे, प्रा.दत्ता सोमवंशी, ऍड.गोपाळ बुरबूरे, रामराव गवळी, प्रदीप नणंदकर, बँकींग नेते धनंजय कुलकर्णी,  प्राचार्य डी.पी.कांबळे, बी.व्ही.स्वामी,गुंडू माने, भगवानराव पाचपिंडे आदिंनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم