नांदुर्गा परीसरातील कोथिंबीर रायपुरच्या बाजारात

 नांदुर्गा परीसरातील कोथिंबीर रायपुरच्या बाजारात

नांदुर्गाःगावरान कोथिंबीर म्हणून ओळख असलेल्या नांदुर्गा व परिसरातील कोथिंबीरला सध्या मोठमोठ्या महानगरातून मागणी होत असून,नगदीचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोथिंबीर पेरणीमुळे थोड्या बहोत का होईना शेतकऱ्यांना या पिकाच्या पेरणीमुळे फायदा झाल्याचे दिसून येत आहे. नांदुर्गा,मंगरूळ,गुबाळ,गांजनखेडा, सारणी,हसलगण,मातोळा,देवताळा, या परिसरातील कोथिंबीरला मुंबई, पुणे,नागपूर,अमरावती,हैदराबाद, संभाजीनगर,रायपूर आदी महानगरातून तसेच राज्यातून मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते.त्यामुळे नांदुर्गा व परिसरातील बहुतांश शेतकरी सोयाबीन बरोबर कोथिंबीर या पिकाची पेरणी करतात परंतु या वर्षी सुरुवातीच्या काळात पावसाने दरी मारल्यामुळे कोरडवाहू शेतकरी कोथिंबीर या पिकाची पेरणी करू शकला नाही.परिणामी आवक कमी व मागणी जास्त असल्याने मुबलक पाणीसाठा असलेल्या शेतकऱ्याला याचा फायदा झाल्याचे चित्र सध्या नांदुर्गा परिसरात पहावयास मिळत आहे.तसेच या भागातील कोथिंबीर ही गावरान असल्यामुळे रायपुर,सुरत, हैदराबाद, आदी राज्यातून मोठी मागणी केली जाते त्यामुळे शेतकरी तसेच व्यापारी वर्गाला याचा चांगल्या प्रमाणात नफा मिळत असून,अवघ्या चाळीस दिवसांमध्ये एकरी अडीच ते तीन लाख नफा मिळत असून,सध्या गावरान कोथिंबीरची आवक कमी असल्यामुळे मुबलक पाणीसाठा असलेल्या शेतकऱ्यांना याचा चांगला फायदा होत असल्याचे कोथिंबीर व्यापारी कैलास कुंभार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Post a Comment

أحدث أقدم