लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा - संतोष सोमवंशी

 लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न द्यावा  - संतोष सोमवंशी

 औसा : तालुक्यातील खुंटेगाव येथे लोकशाहीर आणाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य बाजार समिती सहकारी संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांच्या हस्ते झाले.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात असंख्य मराठी माणसानी भूमिका घेतली होती त्यावेळी आपल्या बहारदार शैलीने मराठी माणसाच्या नसानसात क्रांतीचे बीज लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी पेरले हा इतिहास असून त्यांनी उपेक्षित वंचित असलेली नायक नायिका  उभा करून फकिरा आणि सतोबा भोसले सारखे क्रांतिकारक उभा केल्याने अखंड भारताला प्रेरणा देणारे प्रचंड साहित्य निर्माण केल्याचा उल्लेख  संतोष सोमवंशी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.असं बहुआयामी असणारे व्यक्तिमत्त्व अण्णाभाऊंचे असल्याने त्यांना भारतरत्न देऊन सन्मानीत करण्यात यावे  . आण्णाभाऊ साठे यांचे विचार डोक्यात घेण्यासाठी सर्वांनी आपापल्या घरामध्ये आण्णाभाऊंचे आत्मचरित्र पुस्तक ठेऊन त्याचे वाचन करावे. अण्णाभाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांचा  पोवाडा रशिया मध्ये पोहचवला असे मत महाराष्ट्र राज्य बाजार समिती संघाचे उपसभापती संतोष सोमवंशी यांनी व्यक्त केले. 
    यावेळी भागवत कांबळे, युवा सेना उपजिल्हाप्रमुख दिनेश जावळे, गणेश जाधव, मनोज सोमवंशी, धानोरा सरपंच सुरेश मुसळे, राजेंद्र सुडके , नंदकुमार कोल्हे, काकासाहेब गोरे, लक्ष्मण गोरे, लक्ष्मण वाघमारे आदीसह बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم