श्री मुक्तेश्वर प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

 श्री मुक्तेश्वर प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

 औसा :-श्री मुक्तेश्वर प्राथमिक शाळेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री शिवलिंग आप्पा शांतीरप्पा औटी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले , संस्थेचे सचिव डॉक्टर बसवराज पटणे, उपाध्यक्ष विजयकुमार मिटकरी, सहसचिव श्री प्रभू आप्पा माशाळे, कोषाध्यक्ष उमाकांत आप्पा मुर्गे, संचालक रवी आप्पा राचट्टे , श्री सुभाष अप्पा मुक्ता ,प्राध्यापक रवींद्र कारंजे ,असंख्य पालक व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री दिलीप कुमार माशाळे यांच्या कल्पनेतून पूर्ण शाळेत तिरंगीमय व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती .शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची आकर्षक अशा तिरंगी टोप्या परिधान करून तहसील कडे प्रभात फेरी काढण्यात आली. बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी पण आकर्षक अशी वेशभूषा केली होती ,तसेच कब बुलबुल च्या विद्यार्थ्यांनी पेटी तबल्यावर सुंदर आवाजात देशभक्तीपर संचलन गीत सादर केले याप्रसंगी शाळेतील काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी यांनी खूप परिश्रम घेऊन स्वातंत्र्याचा सोहळा आनंदी वातावरणामध्ये साजरा केला.

Post a Comment

أحدث أقدم