गोविंदलाल कन्हैयालाल जोशी वाणिज्य महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

 लातूर /प्रतिनिधी :ग्रंथपालनशास्त्राची मुहर्तमेढ रोवणारे डॉ. एस. आर. रंगनाथन यांचा जन्मदिवस याचे औचित्य साधून गोविंदलाल कन्हैयालाल जोशी (रात्र) वाणिज्य महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागामार्फत 'राष्ट्रीय ग्रंथालय दिन' उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मा. डॉ. सुजाता चव्हाण यांनी डॉ. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ग्रंथालयातील ग्रंथांची पुजा केली. तसेच उपस्थितांना माहिती देताना असे प्रतिपादन केले की, “ग्रंथालय म्हणजे महाविद्यालयाचा आत्मा आहे. विना आत्मा जसे शरीर निकामी असते तसेच या ज्ञान सागराचे प्रतिक मानले जाणारे महाविद्यालय हे ग्रंथालय विना निरर्थक होय. म्हणून ग्रंथ व ग्रंथालयाची जपवणूक करणे हे सर्व वाचकांचे व आजीवन अनुभवाच्या माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रथम कर्तव्य आहे.” याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य डॉ. सुजाता चव्हाण, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी डॉ.सचिन प्रयाग, ग्रंथपाल श्रीमती मनिषा लातूरकर, प्रा. निलेश क्षिरसागर, लिपीक सुंदरलाल मैंदरकर व प्रशाकीय कर्मचारी श्री. सुरज शर्मा, श्री. बब्रुवान विभूते उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना ग्रंथपाल मनिषा लातूरकर यांनी केली त आभार प्रदर्शन प्रा. निलेश क्षिरसागर यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم