आतुकली-भातुकली राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये उपक्रम

आतुकली-भातुकली राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये उपक्रम


लातूर-राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलमध्ये शुक्रवारी मराठी विभागाच्या वतीने भातुकलीच्या खेळामध्ये उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमामध्ये स्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन विविध पदार्थ बनवून एकमेकांच्या बनवलेल्या पदार्थांचा आस्वाद घेतला. या उपक्रमाचे उद्घाटन प्राचार्य कर्नल एस श्रीनिवासुलू यांच्या हस्ते स्कूलच्या सभागृहात झाले.भातुकली या शब्दामध्ये अख्खे बालपण सामावले आहे. लहानपणी प्रत्येकानेच घराच्या अंगणात एकदा तरी भातुकलीचा खेळ मांडला असेलच. एकोप्याची भावना निर्माण करणारा हा नुसता खेळ नव्हे, तर एक संस्कारही आहे. महाराष्ट्र, भारतातच नव्हे तर इराण पर्यंत घर घर या नावाने खेळला जाणारा भातुकलीचा खेळ जिवंत ठेवणे ही काळाची नक्कीच गरज आहे. या उद्देशाने लाहोटी स्कूलमध्ये मराठी विषयाच्या शिक्षिका  स्वरांजली भालेकर, मनीषा नाडे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि इयत्ता चौथी वर्गाच्या जवळपास 150 विद्यार्थ्यांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता.बंदिस्त जीवनात एकोप्याचे दर्शन, एकमेकांना आपल्या वस्तू वाटून देण्याचा आनंद तर एकत्रित येऊन एकमेकाच्या आवडीच्या पदार्थांची आरास उपलब्ध गोष्टीतून बनवून आनंद लाटण्याचा हा खेळ, उत्तम व्यवस्थापनाचा धडाच आहे. संघ भावना - खिलाडू वृत्ती चा संस्कार बालमनावर अप्रत्यक्ष पणे कोरणारा भातुकलीच्या खेळात राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश स्कूलचे बाल गोपाळ मस्त रमले होते आणि आनंदात एकमेकांच्या पदार्थांचे कौतुकाने वर्णन करत खाण्याचा छान अनुभव ही त्यांनी घेतला.

Post a Comment

أحدث أقدم