लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुलच्या मुलांनी खो खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले

             लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुलच्या मुलांनी खो खो स्पर्धेत विजेतेपद पटकावले


           लातूर-मातोश्री कलावती प्रतिष्ठान संचालित लातूर येथील लॉर्ड श्रीकृष्ण इंग्लिश स्कुलच्या १४ वर्ष वयोगटात मुलांनी विजेतेपद पटकावले .राष्ट्रीय क्रीडा दीना निमित्त क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यलय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर जिल्हा कार्यलयाच्या मैदानावर खो खो स्पर्धा आयोजित केली.त्यात लॉर्ड श्रीकृष्णा इंग्लिश स्कूल च्या 14 वर्ष वयोगटातील मुलानी विजेतेपद पटकवले.स्पर्धेत लॉर्ड श्रीकृष्णा इंग्लिश स्कूल च्या 14 वर्ष वयोगटामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. लॉर्ड श्रीकृष्णा इंग्लिश स्कूलचे क्रीडा विभाग प्रमुख सुजित माळी यांनी मुलाना खो खो चे प्रशिक्षण दिले.विजेतेपद मिळाल्याबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. मा. लकडे साहेब, लातूर जिल्हा खो खो क्रीडा मार्गदर्शक लोदगेकर , क्रीडा अधिकारी  कृष्णा केंद्रे यांनी विजयी संघाचे खेळाडू यश जवादे, भाग्यवंत फड, प्रतिक जाधव, सार्थक इगारे, लक्ष्मीरमण मानकोस्कर, रुद्र चौधरी,व्यंकटेश केंद्रे, सर्वेश जाधव, रमण केंद्रे, राजन शहा, गजानन झुंजारे, रणवीर बनसोडे, सिद्धांत अलमले,विहांग थडकर, आदित्य आकनगिरे, शिवं मठपती, सोहम झुंजारे, दीपराज सिंग, पृथ्वीराज माळी या मुलांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव केला.या प्रसंगी श्रीकृष्ण लाटे, प्राचार्या दुर्गा भताने, समन्वयक रौफ शेख आणि क्रीडा विभाग प्रमुख सुजित माळी तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिकांनी विजेतेपद पटकावलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन
केले.

Post a Comment

أحدث أقدم