दिलासा फाउंडेशनचे अनेक उपक्रम

                दिलासा फाउंडेशनचे अनेक उपक्रम




कविसंमेलनात ४३ कवींचा सहभाग,उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १० लोकांचा सन्मान,कवितासंग्रहाचे प्रकाशन


लातूर -  दिलासा फाउंडेशन वैभव नगर लातूर हे चारीटेबल ट्रस्ट असून सामाजिक व साहित्य क्षेञात दमदार कामगिरी करत आहे. ७ ऑगस्ट रोजी रक्तदान कार्यक्रम घेतला ज्यात ६१ जणांनी रक्तदान केले याचा महिन्यात हा सलग दुसरा कार्यक्रम दिलासाच्या वतीने कविसंमेलन व  पुस्तक  प्रकाशन  सोहळा व बड्या कामगिरीचा सत्कार या कार्यक्रमाचे आयोजन दिलीप लोभे यांच्या वाढदिवसानिमित्त मयूरा फंक्शन हॉल अंबाजोगाई रोड लातूर येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी योगिराज माने होते तर प्रमुख पाहुणे म्हणून महेबूब गल्लेकाटू ,सपोनि राहूल बहूरे, विश्वनाथ म्हेत्रे, विजयकुमार जगताप,सतिश लोभे,दिलासा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष दयानंद बिराजदार, उपाध्यक्ष दिलीप लोभे आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक जना घुले यांनी केले तर सूञसंचालन दयानंद बिराजदार यांनी केले.कविसंमेलनात निमंञित ४३ कवी/कवियञीने यांनी सहभाग नोंदवला तर सुशिला पवार,तहसीन शेख, बाळासाहेब मगर, सुनिता मोरे,विकास क्षिरसागर, नरसिंग इंगळे, विशाल अंधारे,रिजा पटेल, धम्मायण कांबळे, संगिता कासार, गोविंद गारकर, मधुकर हुजरे,नयन राजमाने, रामदास कांबळे, शामल गोरे, वृषाली पाटील,तनुजा स्वामी, अब्दुल गालीब, जहीरूद्दीन सय्यद जोश, गोविंद जाधव, राजेंद्र माळी, नामदेव कोद्रे आदींच्या कविता उल्लेखनीय झाल्या. तर कवी प्रमोद जाधव यांच्या माझा सवाल आहे कवितासंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. या पुस्तकाचा परिचय यशवंत मस्के यांनी केला. यावेळी बडी कामगिरी करणारे  गुलाम महेबूब गल्लेकाटू , (PSI ATC) लक्ष्मणराव सारुळे,लक्ष्मणराव बेल्लाळे,यशवंत गायकवाड, विवेक सौताडेकर, सतिश लोभे,शरद लोभे,चंद्रकांत कापसे,लालबा कावळे,सतीष सारुळे, भिमराव आलुरे आदींच्या फाउंडेशन च्या  वतीने सन्मानचिन्ह शाल पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आला व दिलीप लोभे यांना दिलासा टीमच्या वतीने भेटवस्तू,शाल, पुष्पहार व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी दीपक क्षीरसागर, भागवत जोशी,राह्याबाई इबत्ते, संगिता होनराव, शाहू बनसोडे, सुभाष पवार,वनराज लोभे, बिभिषण डाके आदींची विशेष उपस्थिती होती.
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रदीप लोभे, सत्यशीला कलशेट्टी, सविता धर्माधिकारी, वंदना केंद्रे, मोहन सावंत, प्रल्हाद सिरमवाड ,महारुद्र डीगे आदीने परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सविता धर्माधिकारी यांनी मांडले.


गझल
जा कुठेही चांगल्याना ञास आहे
चोर सुटतो पामराला फास आहे

घातला बुरखा जरी तो सभ्यतेचा 
हात मळके, कत्तलीचा वास आहे

कोण खोटा अन् लफंगा काय घेणे?
सत्य माझ्या,जीवनाचा ध्यास आहे

न्याय विकले दफ्तरी त्या रक्षकांनी
सांगतो ठासून बघ मी दास आहे

 स्वस्थ जर बसला बळी तर काय खावे?
 कष्ट करुनी चारतो मज घास आहे

चाळले स्टेट्स तिने माझ्या मनाचे
भेटला फोटो, तिचा जो खास आहे
- दयानंद बिराजदार


वाढदिवस

वाढदिवसाचा क्षण 
हो आला 
आनंद मज 
हो झाला 

हारात सारी 
फुले गुंफताना
मित्र परिवार नात्यातील
नाते जपताना
मित्र परिवार शुभेच्छा
देण्यासाठी आज 
मला हो आला
आनंद मज हो झाला...

प्रेमाने तुमच्या
केले मला हो वेडे 
शुभेच्छात आणलात 
हार श्रीफळ आणि पेढे 
आजचा दिवस
आनंदी गोड हो झाला
आनंद मज हो झाला.,.

तान कधी जिवनात
घ्यायचाच नाही
सुख दुःख जिवनाचा
प्रत्येकाचा भाग काही
शुभेच्छाने तुमचा मित्र 
भावनिक हो झाला
आनंद मज हो झाला...

तुमचं आणि माझं
नातं विश्वासाचं असावं
कोणत्याही वेळी
ते निस्वार्थी दिसावं
जिवनात तुम्ही दोन 
शब्द गोड हो बोला 
आनंद मज हो झाला...

वाढदिवस होतोय
साजरा फाउंडेशनच्या वतीने
काम करू मिळून सारे
आणखीन चांगल्याच गतीने 
प्रेमाचा तुमच्या दिलासा
मिळाला हो मला
आनंद मज हो झाला..
आनंद मज हो झाला
-दिलीप लोभे-गांधी चौक लातूर


Post a Comment

أحدث أقدم