महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेतर्फे
लातूर-मराठवाड्यात आर्थिक बँकींग सहकारी क्षेत्रात गतीने वाटचाल करणार्या महाराष्ट्र नागरी सहकारी बँकेच्या गुळमार्केट,लातूर येथील मुख्य कार्पोरेट कार्यालयात महाराष्ट्र नागरी बँकेचे अध्यक्ष भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहन करून एम.एन.एस.बँकेतर्फे 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, संचालक सूर्यकांतराव शेळके, जेएसपीएम संस्थेचे संचलाक दिलीप पाटील, एम.एन.एस.बँकेचे संचालक सूभाषअप्पा सूलगुडले, रविंद्र कांबळे, अॅड.हामणे, भूजंग पाटील, व्यापारी नंदकिशोर सोनी, कार्यकारी संचालक बाळासाहेब मोहिते, जनरल मॅनेजर गहिरवार, शाखा व्यवस्थापक प्रविण जाधव आदी मान्यवरांसह बँकेचे अधिकारी,कर्मचारी, पिग्मी एजंट उपस्थित होेते.
إرسال تعليق