गणेश चतूर्थीनिमित्त श्रीगणेशाची माजी आ.पाटील कव्हेकरांच्या हस्ते महाआरती

गणेश चतूर्थीनिमित्त श्रीगणेशाची  माजी आ.पाटील कव्हेकरांच्या हस्ते महाआरती




लातूर -भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्याहस्ते गणेश चतूर्थीनिमित्त मजगे नगर येथील त्यांच्या कैलास निवासस्थानी श्री.गणेशाची महाआरती करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा जेएसपीएम संस्थेच्या सचिव सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर, प्रमोदिनीताई पाटील कव्हेकर, जेएसपीएमचे कार्यकारी संचालक रंजितसिंह पाटील कव्हेकर, आदितीताई अजितसिंह पाटील कव्हेकर, विश्‍वजीतसिंह पाटील कव्हेकर यांच्यासह कव्हेकर कुटुंबीय उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर म्हणाले की, श्रीगणेशाने सर्व महाराष्ट्रातील जनतेला सुखी, समाधानी ठेवावे, त्यांच्यामध्ये मानवतावादी दृष्टीकोण रूजवून सगळीकडे सुख शांती, समाधान वृंधीगत व्हावे, सर्वांचे आरोग्य निरोगी ठेवावे अशी प्रार्थनाही त्यांनी श्रीगणेशाकडे केली.

Post a Comment

أحدث أقدم