जुगारचे साहित्य,रोख रक्कम असा एकूण 5 लाख 44 हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत. किनगाव पोलीस स्टेशनची कामगिरी
लातूर-अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. किनगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध धंद्याविरूद्ध कारवाई करण्याचे अनुषंगाने किनगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करण्यात आले आहे.
सदर पथक अवैध धंद्यावर कारवाई करीत असताना दिनांक 05/09/2022 रोजी पोलीस ठाणे किनगाव चे सहाय्यक पोलिस निरीक्षक शैलेश बंकवाड यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाणे हद्दीतील मौजे धानोरा (बु) येथे चालू असलेल्या तिर्रट जुगारावर छापा मारला. त्या ठिकाणी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन पत्त्यावर जुगार खेळत व खेळवीत असताना 20 इसम आढळून आले.
सदर ठिकाणी नमूद इसमानी स्वतःच्या फायद्यासाठी पत्त्यावर पैसे लाऊन तिर्रट नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मिळून आले. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य,रोख रक्कम व वापरलेली वाहने असा एकूण 5 लाख 44 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यांच्यावर पोलीस ठाणे किनगाव येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 209/2022 कलम 12(अ) मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास किनगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार मुरकुटे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी अहमदपूर उपविभागाचा तात्पुरता चार्ज असलेले उपविभागीय पोलीस अधिकारी सूधीर खिरडकर यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे किनगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेश बंकवाड, पोलीस अमलदार व्यंकटराव महाके, मल्लिकार्जुन पलमटे, नागनाथ कातळे, सुनील श्रीरामे, होमगार्ड सोमनाथ शिंगडे,आनंद डोंगरे, संदीप मुसळे, नाथराव मुंढे यांनी केली आहे.
إرسال تعليق