डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षकदिन व विद्यार्थी-पालक मेळावा

डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षकदिन व विद्यार्थी-पालक मेळावा 



लातूर/प्रतिनिधी: येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
यानिमित्त विद्यार्थी-पालक मेळावाही घेण्यात आला.
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्राचार्य अंगदराव तांदळे तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डाॅ.बालाजी कांबळे,
बाभळगाव येथील कै.व्यंकटराव देशमुख महाविद्यालयातील राज्यशास्राचे प्राध्यापक डाॅ.
कांतराव पोले यांची उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे आयोजन राज्यशास्र विभागप्रमुख डाॅ.
हर्षवर्धन कोल्हापूरे यांनी केले होते.
  याप्रसंगी डॉ.पोले यांनी विद्यार्थी, पालक व शिक्षकांनीही काळानुरुप बदलले पाहिजे,
असे मत व्यक्त केले.विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा अभ्यास करुन त्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची, माहिती शिक्षकांनी करून दिली पाहिजे असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप इंदिरा मेमोरियल एज्युकेशनल ईन्स्टिट्युट लातूरचे सचिव प्राचार्य अंगदरावजी तांदळे यांनी केला. बी.ए.प्रथम वर्षातील विद्यार्थिनी पूजा नरवटे हिने शिक्षकांविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.
       यावेळी महाविद्यालयातील डाॅ.शिवाजी गाढे,डाॅ.नंदकुमार मगर व डाॅ.उर्मिला धाराशिवे या प्राध्यापकांनी अध्यापन करत करत सामाजिक व शैक्षणिक प्रगती केल्यामुळे शिक्षक दिनानिमित्त त्यांचा सत्कार प्राचार्य तांदळे यांच्या हस्ते करण्यात आला.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ.बालाजी कांबळे,सुत्रसंचलन डाॅ.राजाराम दावणकर तर आभार डाॅ.हर्षवर्धन कोल्हापूरे यांनी मानले.

Post a Comment

أحدث أقدم