लातूरच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयास यशवंतराव चव्हाणमहाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ नाशीकच्या अभ्यासकेंद्राची मान्यता

लातूरच्या स्वामी विवेकानंद महाविद्यालयास यशवंतराव चव्हाण
महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ नाशीकच्या अभ्यासकेंद्राची मान्यता


लातूर -जेएसपीएम संचलित 35 युनिटच्या माध्यमातून संस्थेचे काम राज्यभरात सुरू आहे. अध्यात्म, विज्ञान व व्यावसायीकतेवर आधारीत तेजस्वी तरूण घडावे ही भूमिका लक्षात घेवून जेएसपीएम या संस्थेने शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी क्रांती केलेली आहे. यामध्ये आणखी एका युनिटची भर पडली असून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत अभ्यास केंद्र मंजूर झाले असून जेएसपीएम संचलित स्वामी विवेकानंद महाविद्यालयाला मुक्‍त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राची मान्यता मिळाली असून यामध्ये बी.ए., बी.कॉम, बी.लीब यांसह पत्रकारीता क्षेत्रातील बॅचलर ऑफ मास कम्युनिकेशन (बी.ए) या अभ्यासक्रमाचा समावेश करण्यात आलेला आहे.
जेएसपीएम संचालित स्वामी विवेकानंद महाविद्यालय, लातूर या युनिटला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ नाशिकच्यावतीने अभ्यासकेद्रांची मान्यता नुकतीच मिळाली असून या केंद्रास कोड क्रमांक 84143 हा देण्यात आलेला आहे. या केंद्राअंतर्गत बी.ए., बी.कॉम, बी.लीब, अ‍ॅन्ड इन्फोसायन्स या अभ्यासकेंद्रास मान्यता मिळाली असून या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रियाही सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे या अभ्यासकेंद्राअंतर्गत प्रवेश घेवू इच्छीणार्‍या विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकांनद महाविद्यालय एमआयडीसी, कळंब रोड,लातूर या महाविद्यालयाअंतर्गत येणार्‍या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठ नाशिक अंतर्गत येणार्‍या या अभ्यासकेंद्राशी संपर्क साधावा किंवा अधिक माहितीसाठी केंद्र संयोजक प्रा.सुमित सातपूते (मो.नं.8208992717), सहाय्यक प्रा.सागर यादव (मो.नं.8408925396), प्रभारी प्राचार्य एम.ए.गायकवाड (मो.नं. 9404485265) यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन अभ्यासकेंद्राच्यावतीने करण्यात आलेले आहे.

Post a Comment

أحدث أقدم