असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट व सिव्हिल इंजिनियर्सच्या वतीने अभियंता दिन साजरा


असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट व सिव्हिल इंजिनियर्सच्या वतीने अभियंता दिन साजरा 


    लातूर/प्रतिनिधी:असोसिएशन ऑफ आर्किटेक्ट व सिव्हील इंजिनियर्स (AACC),लातूर व डॉ. फिक्सिट यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची जयंती आणि अभियंता दिवस साजरा करण्यात आला.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असोसिएशनचे संस्थापक मनोज सूर्यवंशी तर प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे येथील भारती विद्यापीठातील प्राध्यापक अर्चना गायकवाड यांची उपस्थिती होती. यावेळी प्राध्यापक गायकवाड यांचे "ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट आणि त्याचा वापर" या विषयावरील व्याख्यानही संपन्न झाले.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक असोसिएशनचे संस्थापक मनोज सूर्यवंशी तर पाहुण्यांचा परिचय सचिव अनंत गाडे यांनी करून दिला.असोसिएशनचे अध्यक्ष सुधीर बिर्ले यांनी उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वजीत मांडे, रितेश अवस्थी,भागवत बरुरे, गणेश बिडवे,महेश नावंदर,शफी शेख,रियाज शेख,विजयसिंग जाधव,रमेश घोलप,सागर आंबेकर,प्रदीप सुरवसे,सचिन कापसे यांच्यासह असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले.हॉटेल अंजनी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास जिल्ह्यातील सिव्हिल इंजिनियर व आर्किटेक्ट यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Post a Comment

أحدث أقدم