नागरसोगा येथे गणेशोत्सव निमित्त गणेश मंदिरात रक्तदान शिबीर

नागरसोगा येथे गणेशोत्सव निमित्त गणेश मंदिरात रक्तदान शिबीर 


नागरसोगा  - ‘रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान‘ असे समजले जाते. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजविणे आणि त्यांना रक्तदानासाठी प्रेरित करण्याच्या अनुषंगाने गणेश नगर मधील गणेश भक्त युवकांनी रक्तदान शिबिराचे आयोजन  केले, डॉ.भालचद्र ब्लड बँक चे कर्मचारी दिगाबर पवार, संतोष पाटील, गायत्री ईगवे,उध्दव वाघमारे, संजय ठाकूर यांनी सहकार्य केले व  दिलीपराव सुर्यवंशी,चंद्र-हास पाटील,भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य गोटु केंद्रे, ज्ञानेश्वर चव्हाण , विठ्ठल सुर्यवंशी,राजू सुर्यवंशी,  सतीस सूर्यवंशी,संदीपान सूर्यवंशी ,युराज उबाळे,अमोल सूर्यवंशी,नितीन सूर्यवंशी,किशोर माळी,दत्ता सूर्यवंशी,बाळू तेलंगे,विजय यादव, श्रीकात स्वामी आदी ग्रामस्थ उपस्थित असून यापैकी काही नी रक्तदान केले.
    रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे. अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात. त्यामुळे तरुणाईने अधिकाअधिक रक्तदान करण्याचे आवाहन आ.अभिमन्यू पवार यांचे चिरंजीव परीक्षीत पवार यांनी गावातील युवकांना केले. शिबिरात जवळपास ३६च्या वर युवकांनी रक्तदान केले. गरजू रुग्णांसाठी हा मदतीचा हात मिळावा, या अनुषंगाने हा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

Post a Comment

أحدث أقدم