जयक्रांती इंग्लिश स्कूलमध्ये नीट उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार

छायाचित्र : किल्लारी येथील जयक्रांती इंग्लिश स्कूलमध्ये नीट पास विद्यार्थी व आल्याचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला


जयक्रांती इंग्लिश स्कूलमध्ये नीट उत्तीर्ण विद्यार्थ्याचा सत्कार

किल्लारी- येथील जयक्रांती इंग्लिश स्कूलमध्ये सेवेत असलेल्या सहशिक्षिका सुलक्षणा सावंत यांचा मुलगा सागर शशिकांत सावंत या विद्यार्थ्याने मेडिकलला संबंधित असलेली अभियोग्यता चाचणी परीक्षेमध्ये ७२० पैकी ६०६ गुण प्राप्त करून विशेष प्राविण्य मिळवत्याबद्दल  शाळेतर्फे सत्कार ठेवण्यात आला होता. 
प्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली दुधनी यांनी सुलक्षणा सावंत यांचा सत्कार केला. संस्थेचे सदस्य चंद्रकांत बिराजदार यांनी सागर सावंत यांचा सत्कार केला. 
यावेळी सागर सावंत यांनी आपल्या शैक्षणिक जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी मुख्याध्यापिका वैशाली दुधनी यांनी मनोगत व्यक्त केले. पुढील शैक्षणिक प्रवासाला शुभेच्छा दिल्या.
 यावेळी संस्थेचे अध्यक्ष बसवराज दुधनी, संस्थेचे उपाध्यक्ष शाहूराज वाळके, लदाफ युनुस, भाग्योदय दुधनी, अश्विनी जिरगे, बसवराज कवठाळे, राजशेखर बिराजदारसह शिक्षक वृंद उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जाधव यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم