कृषि उत्पन्न बाजार समिती औसा ची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

 


   कृषि उत्पन्न बाजार समिती औसा ची  वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न





औसा -कृषि उत्पन्न बाजार समितीची सन २०२१-२२ ची सर्वसाधारण सभा संपन्न झाली. या सभेचे सुरवातीला बाजार समितीचे मुख्यप्रशासक  राजेंद्र हरिश्चंद्र भोसले व उपमुख्य प्रशासक किशोर अरविंद जाधव यांच्या हस्ते लक्ष्मीच्या प्रतिमेचे पुजन करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी प्रशासक राजेंद्र भणगे,अडत असोसिएशन चे अध्यक्ष मदनलाल झंवर, फारुक शेख, गोविंद दळवे, शरणअप्पा सड्डू,आदींनी दिपप्रज्वलन केले. यानंतर औसा तालुक्यातील दिवंगत सहकार व सामाजिक तसेच दिवंगत इतर मान्यवरांना मौन पाळुन श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या नंतर बाजार समितीचे प्रशासक नामदेव माने यांनी प्रास्ताविक पर भाषण करुन बाजार समितीच्या विकासाकरीता आवश्यक बाबी सभेच्या निदर्शनास आणल्या. यानंतर समितीचे उपमुख्यप्रशासक किशोर जाधव यांनी प्रशासकीय मंडळाच्या कालावधीत केलेल्या विकास कामाची व पुढील काळात करावयाच्या कामाची किल्लारी उपबाजार पेठ प्लॉट वाटप व कंपाउंड वाल चे बांधकाम करणेची माहिती दिली तसेच प्रशासक दत्तात्रय कोळपे यांनी मार्गदर्शन केले .प्रसचिव संतोष कल्याण हुच्चे यांनी वार्षिक अहवालाचे वाचन केले. याप्रसंगी वार्षिक सभेला सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन,प्रतिनिधी, ग्राम पंचायत सरपंच तथा प्रतिनिधी आडते / व्यापारी व हमाल / मापाडीतसेच  तालुक्यातील शेतकरी तसेच बाजार समितीचे सर्व अडते व व्यापारी प्रशासक अशोक जाधव, दिलीप लवटे, संगमेश्वर उटगे ,सतिष जाधव,सोमनाथ सांगवे,रुबाब कल्याणी, निलेश आजने, विजय पवार, तसेच बाजार समितीचे अधिकारी लेखापाल अब्दुलहक्क शेख,कर्मचारी वशीम भुजंग सोमवंशी, सोमनाथ जाधव, महादेव कांबळे, रामेश्वर विभूते  आदी उपस्थित होते तरआभार प्रशासक संगमेश्वर उटगे यांनी केले.

Post a Comment

أحدث أقدم