मार्केट कमिटीच्या विकासासाठी योग्य ते सहकार्य करू- माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

मार्केट कमिटीच्या विकासासाठी योग्य ते सहकार्य करू-  माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर     


  लातूरलातूर कृषी उत्पन्न बाजार समितीला सभापती असताना रेणापूर,  मुरुड, पानगाव उपबाजारपेठेसाठी जमीन खरेदी करून व्यापार्‍यांना प्लॉट देण्यात आले होते. त्याला आज 28 वर्षे पूर्ण होत आहेत.  या काळामध्ये रेणापूर उपबाजारपेठ स्वतंत्र झाली. त्याठिकाणी रोड व इतर सुविधा निर्माण करून व्यापार्‍यांना गावातील व्यवहार बंद करून यार्डात सौदा काढण्यासंदर्भात सांगितले पाहिजे. त्यामुळे मार्केटचा व रेणापूरचा विकास अधिक झाल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी योग्य ते सहकार्य करू असे प्रतिपादन मा.आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
   यावेळी ते रेणापूर बाजार समिती येथील सदिच्छा भेटीप्रसंगी बोलत होते. यावेळी मार्केट कमिटीचे सचिव चक्रे साहेब, जननायक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, पंचायत समितीचे माजी गटनेते आप्पासाहेब पाटील, जननायक संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे,  सुभाषअप्पा सुलगुडले, दिनेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुणे येथील पणन संचालक यांच्याशी संपर्क साधून रेणापूर मार्केट कमिटीला कमी व्याजदराने कर्ज व इतर योजनाचे सहकार्य करण्यासाठी मागणी केली.

 रेणापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीला कर्ज माफीसाठी सहकार्य करू

रेणापूर विविध कार्यकारी सेवा सोसायटीला सेंट्रल बँक ऑफ इंडियातर्फे कर्ज वाटप केले होते. शासनाने कर्जमाफीची योजना जाहीर केली. त्याचा लाभ रेणापूरच्या शेतकर्‍यांना अद्याप मिळाला नाही. त्यासाठी सोसायटीचे चेअरमन अ‍ॅड.देवीदास कातळे प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यात यश आले नाही. यासाठी महाराष्ट्र शासनाकडे मागणी मांडून शेतकर्‍याला कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी आपण प्रयत्न करू असा विश्वासही माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी बोलताना दिला. यावेळी अ‍ॅड.देवीदास कातळे, शिवाजीराव गाडे यांच्यासह सोसायटीचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

أحدث أقدم