“महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात हवाई सुंदरी कु.भूमिका नागसेन कामेगावकर सन्मानित”

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात हवाई सुंदरी कु.भूमिका नागसेन कामेगावकर सन्मानित





लातूर -- येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात कु.भूमिका नागसेन कामेगावकर हिची हवाई सुंदरी म्हणून निवड झाली त्याबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे माजी संचालक डॉ.रवी सरोदे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे  प्राचार्य डॉ.श्रीकांत गायकवाड, उपप्राचार्य डॉ. राजकुमार लखादिवे, किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे सचिव ज्ञानदेव झोडगे, प्रोटान महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.संजय धाबर्डे, कॅप्टन डॉ.बाळासाहेब गोडबोले, डॉ.संजय गवई, डॉ.मोहन मिसाळ, डॉ.डी.एन.मोरे, डॉ.अमोल लाटे, प्रा.प्रकाश वाघमारे, डॉ.पुरुषोत्तम मोरे, माजी नगरसेवक नागसेन कामेगावकर, हेमंत सुटे, प्रा.शिवशरण हावळे, प्रा.रवींद्र सुरवसे आणि डॉ.उत्तम गायकवाड आदींची उपस्थिती होती.  
यावेळी कु.भूमिका कामेगावकर सत्काराला उत्तर देताना म्हणाली की, आपण अथक परिश्रम आणि सातत्य ठेवले तर कुठलेही यश आपल्याला सहज संपादन करता येते. सुरुवातीपासूनच मला जगावेगळ काहीतरी करण्याची मनस्वी इच्छा होती त्यामुळे मी एरोडायनामिक या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला आणि कॅबिन क्रू (हवाई सुंदरी) होण्याचा निर्धार केला. नागपूर येथे हेमंत सुडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅबिन क्रू (हवाई सुंदरी)ची तयारी केली. इंडिगो एअरलाइन्समध्ये जागा निघाल्या तेव्हा मी इंटरव्यू दिला आणि त्यामध्ये माझी निवड झाली आणि सध्या मी हैदराबाद इंडिको एअरलाइन्स येथे कार्यरत आहे. मला भविष्यामध्ये पायलट होण्याची  इच्छा आहे असेही ती म्हणाली.
यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी तिचे हार्दिक अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم